जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : सेल्फीसाठी अनुष्काच्याजवळ आला चाहता, विराट रागाने झाला लाल, Video

IPL 2023 : सेल्फीसाठी अनुष्काच्याजवळ आला चाहता, विराट रागाने झाला लाल, Video

सेल्फीसाठी अनुष्काच्या जवळ आला चाहता, विराटचा रागाने झाला लाल, Video

सेल्फीसाठी अनुष्काच्या जवळ आला चाहता, विराटचा रागाने झाला लाल, Video

आयपीएल दरम्यान विरानुष्का लंच डेट वर गेले असताना एक चाहता सेल्फीसाठी अनुष्काच्या जवळ येऊ लागला, हे पाहून विराटच्या रागाचा पारा चढलेला दिसला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळत आहे. आरसीबीकडून विराट फलंदाजीत जबरदस्त कामगिरी करीत असून त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील स्टेडियममध्ये येऊन त्याला चिअर करताना दिसते. आयपीएल दरम्यान विरानुष्का लंच डेट वर गेले असताना एक चाहता सेल्फीसाठी अनुष्काच्या जवळ येऊ लागला, हे पाहून विराटच्या रागाचा पारा चढलेला दिसला.  सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बंगळुरूच्या ‘सेंट्रल टिफिन रूम’ या रेस्टॉरंटमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे लंच डेटवर आले होते. परंतु विराट अनुष्का या हॉटेलमध्ये आहेत याची बातमी लोकांना कळताच त्यांचे चाहते दोघांची एक झलक पाहण्यासाठी रेस्टॉरंट बाहेर जमले. हळूहळू ही गर्दी इतकी वाढली की विराट अनुष्काला रेस्टॉरंटमधून बाहेर पडणे देखील मुश्किल झाले.

News18लोकमत
News18लोकमत
जाहिरात

अखेर चाहत्यांची गर्दी लोटत विराट अनुष्का कसेबसे रेस्टॉरंटच्या बाहेर पडले, परंतु दरम्यान चाहत्यांचा घोळका त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. अशातच अनुष्का गाडीत बसत असताना एक चाहता सेल्फी काढण्यासाठी तिच्या खूपच जवळ आला यामुळे अनुष्का काहीशी अस्वस्थ झाली. हे पाहून विराट कोहली रागाने लाल झाला त्याने अनुष्काजवळ जाणाऱ्या चाहत्याला व्हायला सांगितले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात