मुंबई, 4 मे : आयपीएल 2023 मध्ये 47 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून केकेआरच्या तब्बल 9 विकेट्स घेतल्या. या दरम्यान हैदराबादचा कॅप्टन एडन मार्करमने केकेआरचा कॅप्टन नितीश राणाचा घेतलेला कॅच लक्षवेधी ठरला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून केकेआरच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरकडून जेसन रॉयने 20, नितीश राणाने 42, रिंकू सिंहने 46, अँड्री रुसेलने 24 तर अनुकूल रॉयने 13 धावा केल्या. हैदराबादच्या गोलंदाजांना केकेआरच्या 9 विकेट्स घेण्यात यश आले. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 171 धावा केल्या.
Just something about Proteas and 👌🏻 fielding efforts... @AidzMarkram's 💥 catch sends the #KKR skipper packing 🔙#IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/bAn65remH3
— JioCinema (@JioCinema) May 4, 2023
IPL 2023 : गौतम गंभीरची पत्नी दिसते अभिनेत्रींपेक्षा ही सुंदर, स्टाईलिश लुक्स पाहून तुम्हीही व्हाल घायाळ फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. केकेआरने पहिल्या पाच ओव्हरमध्येच 3 महत्वाच्या विकेट गमावल्या. तर चौथ्या विकेटसाठी हैदराबाद 12 व्या ओव्हरपर्यंत वाट पाहावी लागली. संघाचा डाव सावरताना केकेआरचा कर्णधार नितीश राणा मैदानात टिकून खेळत होता, त्याने 31 चेंडूत 42 धावा घेतल्या. परंतु 12 व्या ओव्हरमध्ये सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार आणि गोलंदाज एडन मार्करम टाकलेल्या चेंडूवर शॉट मारण्याच्या नादात तो कॅच आउट झाला. एडन मार्करमने सुपरमॅन प्रमाणे हवेत कॅच पकडला आणि राणाला पॅव्हेलियनमध्ये धाडले. सध्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.