मुंबई, 24 मार्च : आयपीएल 2023 ला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. परंतु यंदा बरेच खेळाडू दुखापतीच्या कारणाने आयपीएलच्या 16 व्या हंगामाला मुकणार आहेत. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत देखील कार अपघातात जखमी झाल्याने यंदा मैदानात दिसणार नाही. परंतु दिल्ली संघाने त्याची आठवण ठेवण्यासाठी त्याचा जर्सी नंबर संघाच्या प्रत्येक कॅप आणि जर्सीवर लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचा स्टार खेळाडू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत याच्या कारला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायावर दोन शस्त्रक्रिया पारपडल्या आहेत. या दुखापतीतुन सरवण्यासाठी रिषभला काही महिन्यांचा अवधी लागणार असल्याने त्याचे चाहते यंदा त्याला मैदानावर पाहू शकणार नाहीत.
Virat & Anushka : विराट अनुष्काने पुन्हा दिले कपल गोल! अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसला ग्लॅमरस अंदाज
रिषभ पंत हा दिल्ली संघाचा कर्णधार असण्यासोबतच एक उत्तम विकेटकिपर देखील होता. रिषभच्या अनुपस्थितीत यंदा दिल्ली संघाचे कर्णधार पद डेव्हिड वॉर्नरकडे देण्यात आले आहे. परंतु अद्याप दिल्लीला विकेटकिपिंगसाठी रिषभ सारखा पर्याय सापडलेला नाही. रिषभच्या अनुपस्थितीत आयपीएलमध्ये खेळणे हे दिल्ली संघासाठी देखील कठीण असणार आहे. तेव्हा रिषभबद्दल आदर व्यक्त करून त्याला ट्रीब्युट देण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचे संघ व्यवस्थापन रिषभचा जर्सी क्रमांक त्यांच्या शर्ट किंवा कॅपवर टाकण्याचा विचार असल्याचे संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी सांगितले.
दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग म्हणाले, "रिषभ पंत हा आमच्या संघाचा हृदय आणि आत्मा आहे. दरवेळी तो डगआउटमध्ये माझ्या शेजारी बसलेला असतो. पण यंदा ते शक्य नसल्यास आम्ही त्याला शक्य त्या मार्गाने संघाचा भाग बनवू इच्छितो. तेव्हा त्याच्याबद्दल आदर भाव व्यक्त करण्यासाठी त्याचा जर्सी नंबर आमच्या शर्टवर आणि टोपीवर टाकण्याचा विचार आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2023, Rishabh pant