विराट कोहली काल पत्नी अनुष्का शर्मा हिच्या सोबत मुंबई येथील इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड 2023 या फंक्शनमध्ये पोहोचला होता.
यावेळी अनुष्का शर्माने जांभळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस आणि विराटने काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. यामध्ये दोघे एकमेकांसोबत फारच सुंदर दिसत होते.
विराट अनुष्का जेव्हा अवॉर्ड फंक्शनमध्ये मीडिया समोर फोटो काढण्यासाठी पोहोचले तेव्हा अनुष्काचा ड्रेस हा तिच्या पायात सारखा अडकत होता. तेव्हा विराटने पत्नी अनुष्काचा जमिनीवर लोळणारा ड्रेसचा काही भाग हातात पकडला आणि तिला मदत केली. विराट अनुष्काची ही क्युट मुमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनुष्का शर्माने विराट आणि तिचे काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यावर देखील चाहते लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेत भारताचा पराभव झाल्यानंतर विराट आता 31 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या सीजनसाठी आरसीबी संघासोबत लवकरच सराव सुरु करणार आहे.