जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 RCB vs DC : आरसीबीच्या बॉलर्स समोर दिल्लीच लोटांगण, RCB चा 'विराट' विजय

IPL 2023 RCB vs DC : आरसीबीच्या बॉलर्स समोर दिल्लीच लोटांगण, RCB चा 'विराट' विजय

आरसीबीच्या बॉलर्स समोर दिल्लीच लोटांगण,  RCB चा 'विराट' विजय

आरसीबीच्या बॉलर्स समोर दिल्लीच लोटांगण, RCB चा 'विराट' विजय

आयपीएल 2023 मध्ये 20 सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा पराभव केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 20 सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा पराभव केला आहे. चिन्नस्वामी स्टेडीयमवर खेळवलेल्या सामन्यात आरसीबीने दिल्लीवर 23 धावांनी विजय मिळवला असून ,यंदाच्या आयपीएलमधील  त्यांचा दुसरा सामना जिंकला आहे. बंगळूरु येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम आरसीबीचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी आरसीबीकडून विराट कोहली  आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने संघासाठी चांगली सुरुवात केली. परंतु 22 धावा करून कर्णधार 5 व्या ओव्हरमध्ये बाद झाला.  तेव्हा विराट कोहलीने संघाचा डाव सावरत अर्धशतकीय कामगिरी केली, विराटने 34 ओव्हरमध्ये 50 धावा केल्या. आरसीबीकडून विराट वगळता मॅक्सवेलने 24, हर्षल पटेलने 6, शहाबाजने 20, अनुज रावतने 15 धावा केल्या तर इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही.

News18लोकमत
News18लोकमत

IPL 2023 RCB vs DC : कोहलीची ‘विराट’ कामगिरी, स्टेडियममध्ये अनुष्का शर्माही भारावली Video आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स घालवून 174 धावा केल्या. दिल्ली संघाला विजयासाठी 175 धावांच आव्हान असताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पहिल्या ओव्हरमध्येच स्टार फलंदाज पृथ्वी शॉची विकेट पडली. दिल्लीच्या एका पाठोपाठ एक विकेट पडत असताना 4 कर्णधार डेविड वॉर्नरने 19, अभिषेक पोरलने 50, अक्षर पटेलने 21, अमन खानने 18 , नॉट्रेजने 23 धावा केलया. अखेर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून दिल्ली कॅपिटल्सला केवळ 151 धावा करता आल्या आणि आरसीबीचा 23 धावांनी विजय झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात