जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 KKR vs GT: 'ये क्या था?' रिंकूच्या बॅटिंगवर रणवीर सिंह फिदा

IPL 2023 KKR vs GT: 'ये क्या था?' रिंकूच्या बॅटिंगवर रणवीर सिंह फिदा

 'ये क्या था?' रिंकूच्या बॅटिंगवर रणवीर सिंह फिदा

'ये क्या था?' रिंकूच्या बॅटिंगवर रणवीर सिंह फिदा

गुजरात विरुद्ध केकेआरच्या सामन्यात केकेआर संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेलया रिंकू सिंहचे अभिनेता रणवीर सिंह याने ट्विट करत कौतुक केले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 एप्रिल : आयपीएल 2023 मधील 13 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पारपडला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात केकेआरचा धाकडं फलंदाज रिंकू सिंह हा विजयाचा शिल्पकार ठरला. रिंकूने शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरच्या हाहातून निसटलेला सामना जिंकवून दिला आणि गुजरातला त्यांच्या होम ग्राऊंडमध्ये पराभवाचे पाणी पाजले. केकेआर विरुद्ध गुजरात यांच्यात आज झालेल्या सामन्यात गुजरातने केकेआरला विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना केकेआरला 6 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता होती. यावेळी क्रीजवर केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंह होता. सर्वांनाच हे आव्हान केकेआर पूर्ण करेल असे वाटत नव्हते. परंतु रिंकू सिंहच्या बॅटमधून शेवटच्या ओव्हरमध्ये सलग पाच गगनचुंबी सिक्स निघाले. यामुळे गुजरातने दिलेलं आव्हान केकेआर पूर्ण करू शकली.

News18लोकमत
News18लोकमत
जाहिरात

केकेआरसाठी केलेल्या झुंजार खेळीनंतर रिंकू सिंह चांगलाच प्रकाश झोतात आलेला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह देखील रिंकूच्या बॅटिंग स्टाईलवर फिदा झाला असून त्याने रिंकूचे कौतुक करताना ट्विट केले आहे. यात त्याने “रिंकू !!!!!!!!! रिंकू !!!!!!! रिंकू !!!!!!! रिंकू !!!!!!!!!!!!!!! ये क्या था!?!?!?!” असं म्हंटलय. रिंकूने गुजरात विरुद्ध सामन्यात 21 चेंडूत 48 धावा केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात