अहमदाबाद, 25 मे : आयपीएल 2023 चा क्वालिफायर-2 चा सामना मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये शुक्रवार 26 मे रोजी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल. एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सन लखनऊ सुपर जाएंट्सचा 81 रननी पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये पोहोचली आहे. तर क्वालिफायर-1 च्या सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभलव केला होता. लीग स्टेजमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिल्यामुळे गुजरातला फायनलमध्ये खेळण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
मुंबई आणि गुजरात यांच्यातल्या ज्या टीमचा क्वालिफायर-2च्या सामन्यात विजय होईल ते फायनलमध्ये प्रवेश करतील. रविवार 28 मे रोजी चेन्नईविरुद्ध मुंबई-गुजरातमधली विजयी टीम सीएसकेविरुद्ध फायनल खेळेल. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई-गुजरातमधल्या लढतीला सुरूवात होईल.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरची खेळपट्टी ही बॅटिंगला अनुकूल आहे, त्यामुळे या सामन्यातही मोठ्या स्कोअरची अपेक्षा करण्यात येत आहे.
क्वालिफायर-2 च्या सामन्यावेळी थोड्या ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, पण पावसाची शक्यता फक्त 20 टक्के आहे, त्यामुळे 40 ओव्हरचा सामना होईल हे जवळपास निश्चित आहे.
पावसामुळे मुंबई-गुजरातमधला सामना रद्द झाला तर गुजरातची टीम आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करेल. आयपीएल लीग स्टेजमध्ये मुंबईपेक्षा वरच्या क्रमांकावर राहिल्यामुळे पाऊस पडला तर गुजरातचा फायनलचा मार्ग मोकळा होईल. लीग स्टेजनंतरच्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या आणि मुंबई चौथ्या क्रमांकावर प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, IPL 2023, Mumbai Indians