मुंबई, 27 मार्च : आयपीएलच्या 16 व्या सीजनला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार असून आता सर्वच संघांनी आयपीएलच्या नव्या सिजनसाठी सरावाला सुरुवात केली आहे. सध्या एम एस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात धोनी चेपॉक स्टेडियमवरील खुर्च्या चमकवताना दिसत आहे.
तब्बल दोन वर्षांनी आयपीएलचे संघ आपल्या होम ग्राउंडवर सामने खेळणार आहेत. महेंद्र सिंह धोनीचा चेन्नई संघ देखील चेपॉक स्टेडियमवर कसून सराव करीत आहेत. धोनी आयपीएलसाठी सराव करताना अनेक फोटो व्हिडिओ यापूर्वी समोर आले आहेत. आता आयपीएलला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने धोनी चेपॉक स्टेडियमवर सरावा व्यतिरिक्त काही वेगळे काम करताना देखील दिसत आहे.
सध्या धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात चेपॉक स्टेडियमवर तो खुर्च्यांना चमकवताना दिसत आहे. धोनी एका साहित्याच्या सहाय्याने स्टेडियमवरील खुऱ्या चमकवत असून याने खुर्च्यांचा रंग अधिक गडद होताना पाहायला मिळतोय. त्याने स्टेडियमवरील पिवळ्या आणि निळ्या खुर्च्या चमकावल्याचे पाहायला मिळत आहे.
Definitely it's working - yellow love 💛#IPL #IPL2023 #TATAIPL #ChennaiSuperKings #Yellove #MSDhoni #Dhoni #ThalaDhoni #WhistlePodu pic.twitter.com/xAXDQK8vsX
— MS Dhoni ❤️ #IPL2023 (@CricCrazySubs) March 27, 2023
धोनीचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना आवडला असून चाहते या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Cricket, Cricket news, Csk, IPL 2023, MS Dhoni