लखनौ, 16 मे : आयपीएल 2023 मध्ये 63 वा सामना लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात लखनौने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. लखनौ सुपर जाएंट्सने मुंबई इंडियन्सचा विजयी रथ रोखून त्यांच्यावर 5 धावांनी विजय मिळवला. यासह लखनौने प्लेऑफमध्ये जाण्याची आशा अजूनही पल्लवीत ठेवली आहे. लखनौमधील एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या लखनौच्या फलंदाजांनी ३ विकेट्स गमावून 177 धावांची कामगिरी केली. यात मार्कस स्टोनीसने सर्वोत्तम 89 धावांची खेळी केली. स्टोनिस वगळता लखनौकडून क्विंटन डी कॉकने 16, कृणाल पांड्याने 49 धावांची कामगिरी केली. तर इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने 2 तर पियुष चावलाने 1 विकेट घेतली. मुंबई इंडियन्सला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 173 धावांचे आव्हान मिळाले असताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी मैदानात आली. ईशान किशनने 59 धावांची कामगिरी केली तर रोहित शर्मा संघासाठी 37 धावा करू शकला. मागील दोन मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा तारणहार ठरलेला सूर्यकुमार यादव या सामन्यात फ्लॉप ठरला आणि केवळ 7 धावा करून तो बाद झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये टीम डेविडने चांगली फलंदाजी केली. टीमने 19 चेंडूत 32 धावा ठोकल्या. परंतु अखेर 5 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. मुंबई इंडियन्स या पराभवामुळे प्लेऑफच्या रेसमधून एक पाऊल मागे आली असून लखनौ सुपर जाएंट्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.