मुंबई, 10 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामान खेळवण्यात आला. या सामन्यात लखनऊने आरसीबीचा त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभव करून यंदाच्या आयपीएलमध्ये तिसरा सामना जिंकला. या सामन्यात लखनऊसाठी निकोलस पुरनची वादळी खेळी अतिशय महत्वाची ठरली. पुरनने आयपीएल 2023 मधील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम रचला. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. यात सुरुवातीला लखनऊचा कर्णधार के एल राहुल याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मैदानात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबी संघातून विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेल या तिघांच्या तुफान खेळीमुळे आरसीबी लखनऊ समोर विजयासाठी213 धावांच आव्हान ठेऊ शकली.
Here are the Top 5 Fantasy Players from the #RCBvLSG clash in #TATAIPL 2023 👌👌
— IPL Fantasy League (@IPLFantasy) April 10, 2023
How many of them did you have in your Fantasy Team? 🤔 pic.twitter.com/KSDcCPG4wN
विजयासाठी 213 धावांच आव्हान मिळाल्यानंतर लखनऊ संघाची सुरुवात खराब झाली. एका मागोमाग एक विकेट पडत असताना निकोलस पुरन हा लखनऊचा तारणहार ठरला. त्याने केवळ 19चेंडूत 62 धावा केल्या. त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत चौकार षटकारांची आतिषबाजी केली. दरम्यान त्याने केवळ 15 चेंडूत 51 धावा करून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे अर्धशतक आयपीएल 2023 च्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी चेन्नई संघाकडून खेळताना अजिंक्य रहाणेने केवळ 19 चेंडूत अर्धशतक करण्याचा पराक्रम केला होता. निकोलस पुरनच्या या खेळीमुळे लखनऊ सुपर जाएंट्स आरसीबीने दिलेला मोठा स्कोर चेस करून सामना जिंकू शकली. लखनऊने आरसीबीवर 1 विकेट्सने विजय मिळवला.

)







