जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : दोस्त दोस्त ना रहा! राहुलचा आपल्याच मित्राला दिला धक्का, लखनऊमधून केलं बाहेर

IPL 2023 : दोस्त दोस्त ना रहा! राहुलचा आपल्याच मित्राला दिला धक्का, लखनऊमधून केलं बाहेर

Photo - IPLt20.com

Photo - IPLt20.com

IPL 2023 Updates : आयपीएल 2023 साठी लखनऊ सुपर जाएंट्सने रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 नोव्हेंबर : आयपीएल 2023 साठी लखनऊ सुपर जाएंट्सने रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. लखनऊने मागच्या मोसमातल्या 7 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. केएल राहुल कर्णधार असलेल्या या टीमने मागच्या मोसमात प्ले-ऑफपर्यंत मजल मारली होती. लखनऊचा आयपीएलचा पहिलाच मोसम होता. केएल राहुल आणि मनिष पांडे हे रणजी ट्रॉफी आणि स्थानिक क्रिकेट कर्नाटककडून खेळतात, पण राहुलने लखनऊच्या टीममधून मनिष पांडेलाच बाहेर केलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात मनिष पांडेला संघर्ष करावा लागला होता. मनिष पांडे हा आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय होता. 2009 साली आरसीबीकडून खेळताना मनिष पांडेने शतक केलं होतं. लखनऊने रिलीज केलेले खेळाडू एन्ड्रयू टाय, अंकीत राजपूत, दुष्मंता चमीरा, एव्हिन लुईस, जेसन होल्डर, मनिष पांडे, शाहबाज नदीम लखनऊकडे शिल्लक असलेली रक्कम 23.35 कोटी लखनऊ लिलावामध्ये जास्तीत जास्त 4 खेळाडू विकत घेऊ शकते लखनऊने रिटेन केलेले खेळाडू केएल राहुल, आयुष बदोणी, करण शर्मा, मनन व्होरा, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टॉयनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, काईल मायर्स, कृणाल पांड्या, आवेश खान, मोहसीन खान, मार्क वूड, मयंक यादव, रवी बिष्णोई रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर आता 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठीचा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी म्हणजेच 15 नोव्हेंबरला रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला देणं प्रत्येक 10 टीमना बंधनकारक होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात