मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : पहिल्याच मोसमात आयपीएल चॅम्पियन तरी गुजरात टायटन्सने टीमबाहेर केले हे खेळाडू

IPL 2023 : पहिल्याच मोसमात आयपीएल चॅम्पियन तरी गुजरात टायटन्सने टीमबाहेर केले हे खेळाडू

IPL 2023 Updates आयपीएल 2023 साठी सर्व 10 टीमनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

IPL 2023 Updates आयपीएल 2023 साठी सर्व 10 टीमनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

IPL 2023 Updates आयपीएल 2023 साठी सर्व 10 टीमनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 नोव्हेंबर : आयपीएल 2023 साठी सर्व 10 टीमनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आपल्या पहिल्याच मोसमात आयपीएल चॅम्पियन होणाऱ्या गुजरात टायटन्सनेही काही महत्त्वाच्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याआधी गुजरातने लॉकी फर्ग्युसन आणि रहमतुल्लाह गुरबाज यांना केकेआरला ट्रेड केलं आहे.

गुजरातने रिलीज केलेले खेळाडू

रहमनुल्लाह गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, डॉमनिक ड्रेक्स, गुरुकीरत मान, जेसन रॉय, वरुण एरॉन

शिल्लक रक्कम

19.25 कोटी

गुजरातने रिटेन केलेले खेळाडू

हार्दिक पांड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, ऋद्धीमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवातिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाळ, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, जयंत यादव, आर.साई किशोर, नूर अहमद

गुजरात लिलावात जास्तीत जास्त 3 परदेशी खेळाडू विकत घेऊ शकते.

रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर आता 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठीचा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी म्हणजेच 15 नोव्हेंबरला रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला देणं प्रत्येक 10 टीमना बंधनकारक होतं.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl