मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /KKR vs PBKS : पाऊस आला धावून केकेआर संघ गेला वाहून! पंजाब किंग्सची विजयी सलामी

KKR vs PBKS : पाऊस आला धावून केकेआर संघ गेला वाहून! पंजाब किंग्सची विजयी सलामी

पाऊस आला धावून केकेआर संघ गेला वाहून! पंजाब किंग्सची विजयी सलामी

पाऊस आला धावून केकेआर संघ गेला वाहून! पंजाब किंग्सची विजयी सलामी

शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएलचा दुसरा सामना पारपडला. या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 एप्रिल : शुक्रवार पासून आयपीएलच्या 16 व्या सीजनला सुरुवात झाली आहे. शनिवारी पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएलचा दुसरा सामना पारपडला. या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे पंजाब आणि केकेआरमधील सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे अखेर पंजाबला संघाचा 7 धावांनी विजय झाला आहे.

आयपीएलचा दुसरा सामना आज पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सने सुरुवातीला फलंदाजी करून केकेआरला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले. यात बी राजपक्षे याने पंजाबकडून सर्वाधिक 50 धावा केल्या. त्यासोबतच शिखर धवनने 29 चेंडूत 40, सॅम करनने 26, प्रभसिमरन सिंगने 23 तसेच इतर फलंदाजांनी देखील दोन अंकी धावा करून संघाची धाव संख्या 191 पर्यंत पोहोचवली.

MI VS RCB : रोहित-विराट येणार आमने-सामने, तिकिटासाठी चाहते रात्रभर रांगेत Photo

पंजाब किंग्सने विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिलेले असताना फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या केकेआरची सुरुवात खराब झाली. पंजाबचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह याने दुसऱ्या षटकात 2 विकेट घेऊन केकेआरला धक्का दिला. यात केकेआरचा सलामीवीर मंदीप सिंह 2 धावा करून तर अंकुल रॉय 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने बाजू सावरली. त्याने 28 चेंडूत 35 धावा केल्या परंतु अखेर तो अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्यानंतर केकेआरकडून नितेश राणाने 24, अँड्रे रुसेलने 35 तर रहमानउल्ला गुरबाज याने संघासाठी 22 धावा केल्या. परंतु यानंतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत आणि केकेआरची धाव संख्या 146 असताना स्टेडियमवर पावसाचे आगमन झाले.

पावसामुळे सामना थांबण्यात आला तेव्हा केकेआरची धाव संख्या 16 षटकात 146 वर 7 विकेट अशी होती. तर पंजाबने यापूर्वी 20 षटकात 5 विकेट्स देऊन 191 धावा केल्या होत्या. तेव्हा सरासरीनुसार पंजाब संघ या सामन्यात वरचढ ठरला आणि पंजाब किंग्सला विजयी घोषित करण्यात आले. पंजाबने  7 धावांनी केकेआर संघावर विजय मिळवला.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, KKR, Punjab kings