मुंबई, 1 एप्रिल : शुक्रवार पासून आयपीएलच्या 16 व्या सीजनला सुरुवात झाली आहे. आज आयपीएलचा दुसरा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जात असून युवा गोलंदाज अर्शदीप सिंह केकेआरवर भारी पडताना पाहायला मिळत आहे. पंजाब किंग्स विरुद्ध केकेआर यांच्यात पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या होम ग्राउंडवर आयपीएल चा दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने सुरुवातीला फलंदाजी करून केकेआरला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर पंजाबने दिलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआर संघाला युवा गोलंदाज अर्शदीपने धक्का दिला. अर्शदीप सिंहने दुसऱ्याच ओव्हरमध्ये केकेआरच्या दोन फलंदाजांची विकेट घेतली.
अर्शदीपने आयपीएल 2023 मध्ये टाकलेल्या त्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने केकेआरचा सलामीवीर मंदीप सिंह याची विकेट घेतली. मंदीप सिंह संघासाठी केवळ 2 धावा करून बाद झाला. तर त्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपला दुसरी विकेट घेण्यात यश आले. त्याने अंकुल रॉयची विकेट घेतली. अंकुलने संघासाठी केवळ 4 धावा केल्या.