मुंबई, 4 मे : आयपीएल 2023 मध्ये 47 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडला. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून केकेआरच्या 8 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. संघाचा परफॉर्मन्स पाहून सनरायजर्स हैदराबाद संघाची मालकीण खुश झाली आणि तिने स्टॅन्डमध्ये उभे राहुल जल्लोष केला. हैदराबादचे होम ग्राउंड असलेल्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून दुसऱ्याच ओव्हरपासून केकेआरच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यास सुरुवात केली.
Marco 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐦𝐨𝐧𝐞𝐲 Jansen⚡#SRHvKKR #TATAIPL #IPLonJioCinema #IPL2023 pic.twitter.com/1MCtQAKpnO
— JioCinema (@JioCinema) May 4, 2023
दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅक्रो जॅन्सनने रहमानउल्ला गुरबाजची विकेट घेतली. त्याच ओव्हरमध्ये जॅन्सनने आयपीएल 2023 मध्ये दुसरे शतक ठोकणाऱ्या व्यंकटेश अय्यरला देखील याच्या 7 धावांवर बाद केले. त्यानंतर केकेआरचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला देखील चौथ्या ओव्हरमध्ये बाद करण्यात गोलंदाज कार्तिक त्यागीला यश आले. तर 12 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा कर्णधार नितीश राणाला बाद करण्यात हैदराबादच्या गोलंदाजांना यश आले. हैदराबादने केकेआरच्या 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स घेऊन त्यांना 171 धावांवर रोखले. गोलंदाजीत संघाचा हा परफॉर्मन्स पाहून सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन खुश झाली.
It is Kavya Maran day today. She is all pumped up, jumped up after Andre Russell wicket on 24. She desperately need a win today.#KKRvsSRH #SRHvsKKR pic.twitter.com/DWTLtJ1wFQ
— Figen World (@FigenWorld) May 4, 2023
स्टॅन्डमधून मॅच पाहणारी काव्या मारन केकेआरची प्रत्येक विकेट गेल्यावर जल्लोष करताना दिसली. सध्या काव्या मारनचे हे जल्लोष करतानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.