मुंबई : आयपीएल 2023 ला आजपासून 31 मार्च पासून सुरुवात होत आहे. यंदाचा हा 16 वा सीजन आहे. यातल्या पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात होत आहे. यंदाच्या हंगामात ३२ वर्षांचा खेळाडू आयपीएलमध्ये डेब्यू करणार आहे. राजस्थान टीमकडून तो खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरोधात हा सामना खेळवण्यात येईल. दोन्ही संघांचा हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
राजस्थान रॉयल्स संघ मैदानात उतरेल तेव्हा चाहत्यांच्या नजरा एका अनुभवी खेळाडूवर खिळल्या असतील. तो दुसरा कोणी नसून इंग्लंडचा स्टार क्रिकेटर जो रूट आहे. रूट गेल्या अनेक सत्रांपासून आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक होता. जो रूटचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. आयपीएल 2023 मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.
रोहित शर्मा नक्की कुठे गेला? कॅप्टन्सच्या PHOTO मधून अचानक गायब झाल्याने ट्रोल
जो रूट सध्या 32 वर्षांचा आहे. इंग्लंडसाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. यावेळी जो रूटला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी काही फ्रान्चायझी पुढे देखील आल्या. मात्र राजस्थान टीमने जास्त बोली लावून जो रूटला आपल्या टीममध्ये घेतलं. RR च्या संघाने त्याला आयपीएल 2023 साठी एक कोटी रुपयांमध्ये सामील केले आहे.
क्रिक्रेट करिअर :
जो रूटने आतापर्यंत इंग्लंडकडून एकूण 319 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, 414 डावांमध्ये त्याच्या बॅटमधून 18048 धावा झाल्या आहेत. रूटच्या कसोटी क्रिकेटमध्ये 10948 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6207 धावा केल्या आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 893 धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023, Tata group