अहमदाबाद, 16 मे : आयपीएल 2023 मध्ये काल 62 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने हैदराबादला हरवून प्लेऑफमध्ये धडक दिली. या सामन्यात गुजरातचा फलंदाज शुभमन गिलने देखील शतक ठोकले, परंतु यानंतर गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा नाराज आणि चिडलेला दिसला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात हैदराबादच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यानंतर मैदानात गुजरात संघाकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने 58 चेंडूत 101 धावा करत शतक ठोकले. तर गिल वगळता साई सुदर्शनने 47 धावा केल्या, तर इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही आणि हैदराबादच्या संघाने गुजरातच्या 9 विकेट्स घेतल्या. शुभमन गिलचे शतक हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक होते. त्याने शतक पूर्ण केल्यानंतर गुजरातच्या डग आउटमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. परंतु सर्व खेळाडू गिलसाठी स्टँडिंग ओव्हेशन देत असताना प्रशिक्षक आशिष नेहरा मात्र खाली बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली.
Shubhman Gill hits his maiden IPL hundred❤️ 🙌🏾💪🏾 The future of Indian Cricket🇮🇳 pic.twitter.com/NVVFj3Kl1X
— Dead Inside ICT fan (@Aatmanirbharboi) May 15, 2023
गिलने शतक पूर्ण करताच त्याची विकेट गेली त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या सह इतर खेळाडू देखील स्वस्तात बाद झाले. कर्णधार हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर नेहरा आणि हार्दिकमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे ही पाहायला मिळाले. यावेळी गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी हार्दिकला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले.