मुंबई, 29 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये शनिवारी 39 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात कोलकाताच्या अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याचा अवघड कॅच घेण्यात मोहित शर्माला यश आले. या कमाल कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोहितच्या फिल्डिंगची प्रशंसा केली जात आहे. कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मैदानावर आलेल्या केकेआर संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. केकेआर संघाचा सलामी फलंदाज एन जगदीसन हा तिसऱ्या ओव्हरमध्ये बाद झाला. तेव्हा केकेआर संघाने त्यांच्या फलंदाजीच्या लाइनअपमध्ये बदल करून अष्टपैलू खेळाडू असलेलया शार्दूल ठाकूरला फलंदाजीसाठी पाठवले. परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही.
Mohit Sharma you beauty 🔥🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
A remarkable catch running backwards to dismiss Shardul Thakur 👏🏻👏🏻#TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/QOOS30qusH
शार्दूल ठाकूरने 4 चेंडूंचा सामना केला परंतु यात तो एकही रन बनवू शकला नाही, आणि अखेर शमीने टाकलेल्या चेंडूवर कॅच आउट होऊन तो बाद झाला. शार्दुलने स्ट्रेट शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मैदानावर फिल्डिंगसाठी तैनात असलेल्या मोहित शर्माने पुढून मागे जात हा कॅच पकडला. सध्या या कॅचचा व्हिडिओ व्हायरल होत असून मोहितच्या फिल्डिंगची प्रशंसा केली जात आहे.