जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : महिला अडखळून पडली, तरी फोटो काढण्यात बिझी होता स्टार क्रिकेटर, सोशल मीडियावर झाला ट्रोल

IPL 2023 : महिला अडखळून पडली, तरी फोटो काढण्यात बिझी होता स्टार क्रिकेटर, सोशल मीडियावर झाला ट्रोल

 महिला अडखळून पडली, तरी पोज देण्यात बिझी होता स्टार क्रिकेटर, सोशल मीडियावर झाला ट्रोल

महिला अडखळून पडली, तरी पोज देण्यात बिझी होता स्टार क्रिकेटर, सोशल मीडियावर झाला ट्रोल

रोहित शर्माच्या बर्थ डे पार्टीत घडलेल्या एका घटनेमुळे सध्या क्रिकेटर धवल कुलकर्णी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 एप्रिल : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 30 एप्रिल रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करणार आहे. परंतु आयपीएलच्या बिझी शेड्युलमुळे रोहितने मुंबई इंडियन्सच्या संघाला दोन दिवसांपूर्वीच वाढदिवसाची पार्टी दिली. या पार्टीत अनेक आजी माजी क्रिकेटर उपस्थित होते, दरम्यान या पार्टीतील एक व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात घडलेल्या एका घटनेमुळे क्रिकेटर धवलं कुलकर्णी ट्रोल होत आहे. रोहित शर्मा ने वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये मुंबई इंडियन्सला संघासाठी पार्टीचे आयोजन केले होते. तेव्हा या पार्टीतील क्रिकेट विश्वातील काही आजी माजी खेळाडूंची उपस्थिती होती. यावेळी हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या पापराझी फोटो ग्राफर्ससाठी क्रिकेटर्स पोज देत होते. याच दरम्यान हॉटेलमधून एक तरुणी फोनवर बोलत बाहेर पडत होती. परंतु तिचा पाय बॅरेगेटिंगमध्ये अडकल्यामुळे ती त्यात अडखळून जमिनीवर कोसळली. परंतु याचवेळी फोटो काढत असलेला क्रिकेट धवल कुलकर्णी याने तिला मदत करण्याचे सोडाच परंतु तिच्याकडे  पाहिले देखील नाही.

जाहिरात
News18लोकमत
News18लोकमत

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी धवल कुलकर्णीला यावरून ट्रोल करत आहेत. एका नेटकाऱ्याने म्हंटले, " हा माणूस इतका निर्दयी कसा असू शकतो", तर दुसऱ्याने म्हंटले, “हे क्रिकेटर्स फक्त स्वतःचच पाहतात त्यांना इतर कोणाचीही फिकीर नसते, स्वार्थी” सध्या धवल कुलकर्णीवर या व्हिडिओमुळे टीका होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात