जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 CSK vs SRH : चेन्नई सुपरकिंग्सचा धमाकेदार विजय! सनरायजर्स हैद्राबादचा सलग दुसरा पराभव

IPL 2023 CSK vs SRH : चेन्नई सुपरकिंग्सचा धमाकेदार विजय! सनरायजर्स हैद्राबादचा सलग दुसरा पराभव

चेन्नई सुपरकिंग्स धमाकेदार विजय! सनरायजर्स हैद्राबादचा सलग दुसरा पराभव

चेन्नई सुपरकिंग्स धमाकेदार विजय! सनरायजर्स हैद्राबादचा सलग दुसरा पराभव

आयपीएल 2023 मध्ये 29 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने हैद्राबादचा पराभव केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 29 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने हैद्राबादचा पराभव केला आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा हा सलग दुसरा विजय असून त्यांनी 7 विकेट्सने सनरायजर्स हैद्राबादवर विजय मिळवला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना पारपडला असून या सामन्यात सुरुवातीला धोनीने टॉस जिंकून प्रथम  गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या हैद्राबाद संघाकडून हॅरी ब्रुकने 18, अभिषेक शर्माने 34, राहुल त्रिपाठीने 21, एडन मार्करमने 12, हेनरिक क्लासेनने 17 तर मार्को जॅन्सने देखील 17 धावा केलया.  तर इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. चेन्नई सुपरकिंग्सकडून रवींद्र जडेजाने 3 तर आकाश सिंह, माथेशा पाथीराणा, एम थेक्षाना यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

News18लोकमत
News18लोकमत

हैद्राबादने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स देऊन 134 धावा केल्या आणि चेन्नई सुपरकिंग्सला विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले. चेन्नई सुपरकिंग्सकडून विजयाचे आव्हान पूर्ण करताना ऋतुराज गायकवाडने 35, डेव्हॉन कॉन्वेने 77, अजिंक्य रहाणेने 9, अंबाती रायडूने 9 धावा, मोईन अलीने 6 केल्या. सनरायजर्स हैद्राबादच्या गोलंदाजांना चेन्नईच्या केवळ 3 विकेट घेण्यात आले. मयंक मार्कंडेने अंबाती रायडू आणि अजिंक्य रहाणे या दोघांची विकेट घेतली. तर उमरान मलिकने ऋतुराज गायकवाड याला रनआउट केले. अखेर चेन्नई सुपरकिंग्सचा 7 विकेट्सने विजय झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात