मुंबई, 3 मे : आयपीएल 2023 मध्ये 45 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात खेळवण्यात आला. परंतु यादरम्यान पावसाचे आगमन झाल्यामुळे ही मॅच टाय झाली आहे. दोन्ही संघांना समान पॉईंट्स दिल्यामुळे आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. उत्तरप्रदेशमधील एकना स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना पारपडला. सामना सुरु होण्यापूर्वीच स्टेडियम परिसरात पाऊस पडल्याने सामना सुरु होण्यास काहीसा उशीर झाला. अखेर पाऊस थांबल्यानंतर टॉस जिंकून चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी देखील आपल्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत 19.2 ओव्हरमध्ये पंजाबच्या 7 विकेट्स घेऊन त्यांना 125 धावांवर रोखलं. परंतु 20 ओव्हरपूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा पावसाचे आगमन झाले आणि सामना थांबण्यात आला.
UPDATE - Match has been called off due to rains.#LSGvCSK #TATAIPL https://t.co/AUQfqHU3d2
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
पाऊस थांबून पुन्हा सामना सुरु होण्यासाठी आयोजकांनी काहीकाळ वाट पाहिली परंतु सायंकाळी 7 : 25 पर्यंत ही पाऊस न थांबल्याने हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाना 1-1 पॉईंट देण्यात आले, यामुळे चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांचे 11 पॉईंट झाले असून पॉईंट टेबलमध्ये नेट रन रेट नुसार लखनऊ सुपर जाएंट्सचा संघ दुसऱ्या स्थानी तर चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.