जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : 'आमच्या पोटावर...' शुभमन गिलच्या त्या व्हिडिओवर अभिनेता आयुषमान खुरानाने केली ही कमेंट

IPL 2023 : 'आमच्या पोटावर...' शुभमन गिलच्या त्या व्हिडिओवर अभिनेता आयुषमान खुरानाने केली ही कमेंट

'आमच्या पोटावर...' शुभमन गिलच्या त्या व्हिडिओवर अभिनेता आयुषमान खुरानाने केली ही कमेंट

'आमच्या पोटावर...' शुभमन गिलच्या त्या व्हिडिओवर अभिनेता आयुषमान खुरानाने केली ही कमेंट

शुभमन गिलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यावर बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाने दिलेली कमेंट सध्या बरीच चर्चेत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल : भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्मात असून तो आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्ससाठी  दमदार कामगिरी करीत आहे. शुभमन हा त्याच्या सोशल मीडियावर देखील बराच सक्रिय असून आपल्या चाहत्यांना स्वतःबाबत विविध अपडेट्स देत असतो. अशातच काल शुभमनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यावर बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाने दिलेली कमेंट सध्या बरीच चर्चेत आहे. शुभमन गिलने रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांसह आयपीएलसाठीच्या एका जाहिरातीसाठी शूट केले होते. या जाहिरातील रोहित शर्मा हा एका सावकाराच्या, श्रेयस अय्यर ड्रायव्हरच्या तर शुभमन गिल हा पी ए च्या भूमिकेत होता. आयपीएलच्या निमित्ताने त्यांची ही जाहिरात सध्या चांगलीच गाजतेय. शुभमन गिलने जाहिरातीच्या शूट दरम्यान बेहाइंड द शूटचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत शुभमन गिलने, “मी मूछ लावून तयार आहे, कोणाकडे काही रोल असेल तर सांगा” असे म्हंटले.

News18लोकमत
News18लोकमत

जाहिरातीतील शुभमनच्या लूक आणि अभिनयावर त्याचे फॅन्स फिदा झाले असून अनेकांनी त्याच्या या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान शुभमनच्या या व्हिडिओवर सुप्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराना याने देखील एक कमेंट केली आहे. यात त्याने शुभमनला म्हंटले, " भाऊ तू आमच्या पोटावर का पाय देतोयस" यावर शुभमनने “अरे सर, तुम्ही तर मजा घेत आहात,” असे म्हणत काही हसण्याचे ईमोजी शेअर केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात