मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरु आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर याचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले आहे. मुंबई इंडियन्सने तब्बल 2 वर्षानंतर अर्जुन तेंडुलकरला प्लेयिंग 11 मध्ये संधी दिली आहे. मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील 22 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यातून 23 वर्षांचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकर हा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर चा मुलगा असून मुंबई इंडियन्स कडून तब्बल २ वर्षांनी त्याला प्लेयिंग 11 मध्ये संधी देण्यात आली आहे.
Captain Rohit Sharma gave the debut cap to Arjun Tendulkar !! 💙
— Tanay Vasu (@tanayvasu) April 16, 2023
pic.twitter.com/fQLbnTAFjb
आयपीएल 2021 साठी झालेल्या ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने त्याच्या बेस प्राईजवर म्हणजेच 20 लाख रुपये खर्च करून त्याला खरेदी केले होते. परंतु पहिल्या वर्षी सरावा दरम्यान काही दुखापत झाल्याने त्यावर्षी त्याचे आयपीएलमध्ये पदार्पण होऊ शकले नाही. तर गेल्यावर्षी आयपीएल 2022 मध्ये देखील मुंबई इंडियन्स संघाकडून त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
यंदा आयपीएल 2023 मध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स पदार्पणाची संधी मिळू शकते अशी माहिती आयपीएल पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितशर्मा आणि मुख्य प्रशिक्षक यांनी दिली होती. अखेर 16 एप्रिल रोजी कोलकाता विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले आहे. अर्जुन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत केवळ 7 प्रथम श्रेणी, 7 लिस्ट ए आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने एकूण 32 विकेट घेतल्या असून एकूण 268 धावा केल्या आहेत.