जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : एकही मॅच न खेळणारा RCB साठी ठरणार लकी चार्म! तीन टीमना जिंकवून दिलेय ट्रॉफी

IPL 2022 : एकही मॅच न खेळणारा RCB साठी ठरणार लकी चार्म! तीन टीमना जिंकवून दिलेय ट्रॉफी

IPL 2022 : एकही मॅच न खेळणारा RCB साठी ठरणार लकी चार्म! तीन टीमना जिंकवून दिलेय ट्रॉफी

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीचं (RCB) नशीब जोरदार आहे. आयपीएलच्या या हंगामात बरेच वेळा लकी ठरलेल्या आरसीबीच्या टीममध्ये एक लकी चार्मही आहे, ज्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळालेली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 27 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीचं (RCB) नशीब जोरदार आहे. लीग स्टेजमध्ये मुंबईने दिल्लीचा (MI vs DC) पराभव केल्यामुळे आरसीबीने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला, यानंतर एलिमिनेटरमध्ये (IPL Eliminator) त्यांनी लखनऊला (LSG) धूळ चारली. या सामन्यातही शतकवीर रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि विस्फोटक बॅटिंग केलेल्या दिनेश कार्तिकलाही लखनऊने जीवनदान दिली. आता आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होत आहे. या सामन्यात आरसीबीचा विजय झाला तर ते आयपीएल फायनलमध्ये पोहोचतील. आरसीबीची टीम आता ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त दोन पावलं दूर आहे. आयपीएलच्या या हंगामात बरेच वेळा लकी ठरलेल्या आरसीबीच्या टीममध्ये एक लकी चार्मही आहे, ज्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्मा (Karn Sharma) यावेळी आरसीबीच्या टीममध्ये आहे. कर्ण शर्मा या मोसमात एकही मॅच खेळला नाही, पण याआधीही तो बऱ्याच टीमसाठी लकी ठरला, कारण तो याआधी आयपीएलच्या तीन टीमकडून खेळला, ज्यांना ट्रॉफी जिंकण्यात यश आलं. कर्ण शर्माला आरसीबीने 50 लाख रुपयांना विकत घेतलं. याआधी तो मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादकडून खेळला, या टीमसोबत तो आयपीएल जिंकला आहे.

News18

2016 साली सनरायजर्स हैदराबाद चॅम्पियन झाली तेव्हा कर्ण शर्मा त्या टीमचा भाग होता. यानंतर 2017 साली मुंबई ट्रॉफी जिंकली तेव्हा तो मुंबईच्या टीममध्ये होता. 2018 ते 2021 कर्ण शर्मा सीएसकेमध्ये होता तेव्हा त्यांनी 2018 आणि 2021 साली आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं, त्यामुळे आता कर्ण शर्मा आरसीबीसाठीही लकी चार्म ठरेल, अशी अपेक्षा आरसीबीचे चाहते व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ipl 2022 , RCB
  • First Published :
जाहिरात
जाहिरात