जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : ...म्हणून त्याला खेळवलं नाही, मुंबईच्या कोचने सांगितली Arjun Tendulkar ची 'कमजोरी'!

IPL 2022 : ...म्हणून त्याला खेळवलं नाही, मुंबईच्या कोचने सांगितली Arjun Tendulkar ची 'कमजोरी'!

IPL 2022 : ...म्हणून त्याला खेळवलं नाही, मुंबईच्या कोचने सांगितली Arjun Tendulkar ची 'कमजोरी'!

आयपीएल 2022 च्या मोसमात (IPL 2022) पाच वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली. टीममध्ये असलेल्या 24 पैकी 21 खेळाडूंना मुंबईने खेळण्याची संधी दिली, पण सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) अजूनही मैदानात उतरला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 जून : आयपीएल 2022 च्या मोसमात (IPL 2022) पाच वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली. 15 वर्षांच्या आयपीएल इतिहासात मुंबई पहिल्यांदाच पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली. यावर्षी मुंबईला 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकता आल्या. टीममध्ये असलेल्या 24 पैकी 21 खेळाडूंना मुंबईने खेळण्याची संधी दिली, पण सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) अजूनही मैदानात उतरला नाही. मुंबईने अर्जुन तेंडुलकरला लिलावामध्ये 30 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. अर्जुन हा डावखुरा फास्ट बॉलर आहे. मुंबईने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर अर्जुनचे बॉलिंग करतानाचे व्हिडिओ टाकले, यात अर्जुन अचूक यॉर्कर टाकत होता. मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच शेन बॉण्ड (Shane Bond) यांनी अर्जुन तेंडुलकरला या मोसमात का खेळवलं नाही, याचं कारण सांगितलं आहे. बॅटिंग आणि फिल्डिंग सुधारण्यासाठी अर्जुनला अजून बरंच ट्रेनिंग आणि कठोर परिश्रम करावे लागणार आहेत, असं शेन बॉण्डने सांगितलं. स्पोर्ट्सकीडा सोबत शेन बॉण्ड बोलत होता. ‘अर्जुन तेंडुलकरला अजूनही बरंच काम करावं लागणार आहे. तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या टीमकडून खेळता तेव्हा स्क्वॅडमध्ये असणं वेगळं आणि प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं वेगळं. त्याला अजून बरंच सुधारावं लागणार आहे. त्याच्यावर अजून बरंच काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाला संधी दिली पाहिजे असं आपण म्हणतो, पण या लेव्हलला तुम्हाला तुमची जागा सिद्ध करून मिळवावी लागते. त्याला बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तो यात सुधारणा करेल आणि टीममध्ये स्थान कमवेल, अशी अपेक्षा आहे,’ असं बॉण्ड म्हणाला. अर्जुन तेंडुलकरचं 2022 हे मुंबई इंडियन्ससोबतचं दुसरं वर्ष होतं. मागच्या वर्षी झालेल्या लिलावात मुंबईने अर्जुनला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं, पण संधी मिळायच्या आधीच तो दुखापतीमुळे टीमबाहेर झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात