मुंबई, 22 फेब्रुवारी : आयपीएल 2022 ला (IPL 2022) पुढच्या महिन्यात सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या तारखांची घोषणा झाली नसली तरी 26 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होईल, असं सांगितलं जातंय. आयपीएलच्या या मोसमासाठी आपण सज्ज असल्याचं मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) खेळाडू टीम डेव्हिडने (Tim David) सांगितलं आहे. टीमला मुंबई इंडियन्सनी लिलावामध्ये तब्बल 8.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. सिंगापूरमध्ये जन्मलेला या ऑस्ट्रेलियन खेळाडूने जगभरातल्या टी-20 लीगमध्ये आक्रमक खेळाडू म्हणून नाव कमावलं आहे. आता डेव्हिड आयपीएलमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) या बड्या खेळाडूंसोबत मैदानात दिसेल.
कायरन पोलार्डला आदर्श मानणारा 25 वर्षांचा टीम डेव्हिड मुंबई इंडियन्स डॉट कॉमशी बोलत होता. 'पोलार्डसोबत बॅटिंग करण्याचा विचारही रोमांचक आहे. पोलार्डच्या पॉवर हिटिंगचा मीदेखील फॅन आहे. त्याच्या काही खेळी बघून मीदेखील हे करू शकतो, असं मला वाटतं. जर आम्ही शेवटच्या काही ओव्हरमध्ये बॅटिंगला आलो तर मॅच विरोधी टीमच्या हातातून खेचून आणू शकतो,' असं डेव्हिड म्हणाला.
A तोडफोड मंडळ of & ℙ finishing games off is a prospect all of us are waiting to witness Read our exclusive interview with him https://t.co/pzuoUnLyJR#OneFamily #MumbaiIndians @timdavid8 @KieronPollard55 pic.twitter.com/qpkzYmhfWo
— Mumbai Indians (@mipaltan) February 22, 2022
रोहित शर्मा वर्ल्ड क्लास खेळाडू
'रोहित शर्मा वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. तो खूप सहज बॅटिंग करतो असं वाटतं. या स्तराच्या खेळाडूसोबत वेळ घालवणं आणि त्याच्या डोक्यात काय चाललं आहे, हे जाणून घेणं माझ्यासाठी चांगलं असेल. आयपीएलमध्ये मी माझा खेळ सरळ आणि सोपा ठेवेन. मी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये बॅटिंगला येऊ शकतो. पण माझा उद्देश सकारात्मक बॅटिंग करणं आणि धोका पत्करण्यासाठी तयार राहणं, हाच असेल,' अशी प्रतिक्रिया डेव्हिडने दिली.
मागच्या मोसमात आरसीबीमध्ये
टीम डेव्हिड आयपीएलच्या मागच्या मोसमात आरसीबीच्या (RCB) टीममध्ये होता. तो बिग बॅश लीग (BBL), पाकिस्तान सुपर लीग (PSL), द हंड्रेड आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही (CPL) खेळला आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी टीम डेव्हिडसोबत द हंड्रेडमध्ये काम केलं होतं. तिकडेच डेव्हिडची बॅटिंग पाहून जयवर्धने प्रभावित झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians