मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : चुकीला माफी नाही! टीम डेव्हिडने एक हाती काढलेली मॅच स्वत:च घालवली!

IPL 2022 : चुकीला माफी नाही! टीम डेव्हिडने एक हाती काढलेली मॅच स्वत:च घालवली!

Photo-IPL/Twitter

Photo-IPL/Twitter

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) त्यांचा 10वा पराभव पत्करावा लागला. टीम डेव्हिडच्या (Tim David) आक्रमक बॅटिंगमुळे मुंबईच्या हातात विजय आला होता, पण डेव्हिडनेच केलेल्या मोठ्या चुकीची शिक्षा मुंबईला भोगावी लागली.

पुढे वाचा ...

मुंबई, 17 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) त्यांचा 10वा पराभव पत्करावा लागला. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा (MI vs SRH) फक्त 3 रनने पराभव झाला. हैदराबादच्या 194 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 190/7 पर्यंत मजल मारता आली. टीम डेव्हिडच्या (Tim David) आक्रमक बॅटिंगमुळे मुंबईच्या हातात विजय आला होता, पण डेव्हिडनेच केलेल्या मोठ्या चुकीची शिक्षा मुंबईला भोगावी लागली.

मुंबई इंडियन्ससाठी हे आव्हान कठीण वाटत असतानाच टीम डेव्हिडने (Tim David) 18 व्या ओव्हरमध्ये टी नटराजनची (T Natrajan) धुलाई केली. नटराजनच्या या ओव्हरमध्ये डेव्हिडने 4 सिक्स मारल्या याशिवाय त्याने 2 वाईड बॉलही टाकले. ओव्हरच्या पहिल्या 5 बॉलला 26 रन आलेले असतानाही डेव्हिडने शेवटच्या बॉलवर नसलेली रन घ्यायची चूक केली, यात तो रन आऊट झाला आणि मुंबईच्या हातात आलेला विजय निसटला.

18व्या ओव्हरला 26 रन आल्यानंतर भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) 19वी ओव्हर मेडन टाकली आणि एक विकेट घेतली, ज्यामुळे मुंबईचा विजय अशक्य झाला. डेव्हिडने 18 बॉलमध्ये 255.56 च्या स्ट्राईक रेटने 46 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता.

मुंबई राहणार शेवटच्या क्रमांकावर

आयपीएलच्या या मोसमात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली. मोसमाच्या पहिल्या 8 मॅच गमावल्यानंतरच मुंबईचं प्ले-ऑफचं आव्हान संपुष्टात आलं होतं. या मोसमातल्या 13 मॅचमध्ये मुंबईने फक्त 3 मॅच जिंकल्या असून 10 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आता सिझनची शेवटची मॅच जिंकली तरीही मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये अखेरच्या क्रमांकावर राहणार आहे.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, SRH