मुंबई, 17 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs SRH) यांच्यात थरारक सामना झाला. या सामन्यात मुंबईचा 3 रननी विजय झाला. हैदराबादने दिलेलं 194 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी चांगली सुरूवात केली. या दोन्ही ओपनरनी 10.4 ओव्हरमध्ये 95 रनची पार्टनरशीप केली, पण दोघंही एका पाठोपाठ एक आऊट झाले. रोहितने 48 तर इशानने 43 रनची खेळी केली.
मुंबई इंडियन्ससाठी हे आव्हान कठीण वाटत असतानाच टीम डेव्हिडने (Tim David) 18 व्या ओव्हरमध्ये टी नटराजनची (T Natrajan) धुलाई केली. नटराजनच्या या ओव्हरमध्ये डेव्हिडने 4 सिक्स मारल्या याशिवाय त्याने 2 वाईड बॉलही टाकले. ओव्हरच्या पहिल्या 5 बॉलला 26 रन आलेले असतानाही डेव्हिडने शेवटच्या बॉलवर नसलेली रन घ्यायची चूक केली, यात तो रन आऊट झाला आणि मुंबईच्या हातात आलेला विजय निसटला.
18व्या ओव्हरला 26 रन आल्यानंतर भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) 19वी ओव्हर मेडन टाकली आणि एक विकेट घेतली, ज्यामुळे मुंबईचा विजय अशक्य झाला. डेव्हिडने 18 बॉलमध्ये 255.56 च्या स्ट्राईक रेटने 46 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. हैदराबादकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 193/6 पर्यंत मजल मारली. राहुल त्रिपाठीने 44 बॉलमध्ये 76 रन, प्रियम गर्गने 26 बॉलमध्ये 42 आणि निकोलस पूरनने 22 बॉलमध्ये 38 रन केले. मुंबईकडून रमणदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय सॅम्स, मेरेडिथ आणि बुमराह यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
मुंबईविरुद्धच्या या विजयासोबतच हैदराबादच्या प्ले-ऑफच्या आशा अजूनही शिल्लक आहेत. आता मोसमातल्या अखेरच्या सामन्यातही विजय मिळवून इतर टीमच्या कामगिरीवर हैदराबादला अवलंबून राहावं लागणार आहे. हैदराबादने 13 पैकी 6 मॅच जिंकल्या आहेत, तर 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, SRH