मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 गाजवल्यानंतर Rahul Tripathi निवडणुकीच्या मैदानात, पाहा कोणासाठी करतोय प्रचार

IPL 2022 गाजवल्यानंतर Rahul Tripathi निवडणुकीच्या मैदानात, पाहा कोणासाठी करतोय प्रचार

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) सनरायजर्स हैदराबादने (SRH) धमाकेदार कामगिरी केली. आयपीएल संपल्यानंतर आता राहुल त्रिपाठी निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे.

मुंबई, 27 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) सनरायजर्स हैदराबादने (SRH) धमाकेदार कामगिरी केली. राहुल त्रिपाठीच्या या कामगिरीनंतर त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa T20) 5 टी-20 मॅचसाठी टीम इंडियामध्ये निवड होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण त्याच्या पदरी निराशा आली. आयपीएल 2022 मध्ये हैदराबादचं आव्हान लीग स्टेजलाच संपुष्टात आलं, त्यामुळे राहुल त्रिपाठी आता निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे.

झारखंडच्या पालूममध्ये राहुल त्रिपाठी गुरूवारी आला होता. पालूममधलं रजवाडीह राहुल त्रिपाठीचं आजोळ आहे. राहुलची मामी रजवाडीह पंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक लढवत आहे. मामीच्या प्रचारासाठी राहुल त्रिपाठी त्याच्या गावी आला होता.

राहुल त्रिपाठी सनरायजर्स हैदराबादचा या मोसमात सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू होता. त्याने 14 मॅचमध्ये 37.55 ची सरासरी आणि 158.23 च्या स्ट्राईक रेटने 413 रन केले, यात 2 अर्धशतकांचा समावेश होता.

रजवाडीहमध्ये राहुल त्रिपाठीने पत्रकारांशी संवाद साधला. 'चांगला खेळ करून भारतीय क्रिकेट टीममध्ये जागा मिळवण्यचा माझा प्रयत्न आहे. भारतासाठी खेळणं माझं स्वप्न आहे. आयपीएल खेळाडूंसाठी उत्कृष्ट व्यासपीठ आहे, इकडे आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते,' असं त्रिपाठी म्हणाला.

केकेआर आणि हैदराबादकडून खेळताना आपल्याला खूप काही शिकण्याची संधी मिळाली. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि एमएस धोनी माझे आयडल आहेत, अशी प्रतिक्रिया राहुल त्रिपाठीने दिली. 22 वर्षांनी आजोळी आल्यामुळे आनंद होत आहे, असंही तो म्हणाला. राहुल त्रिपाठी महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.

First published:

Tags: Ipl 2022, SRH