Home /News /sport /

IPL 2022 : ...तर पाकिस्तानचे 6 खेळाडू आयपीएलच्या या टीममध्ये असते, Shoaib Akhtar ने सांगितली फ्रॅन्चायजींची गरज

IPL 2022 : ...तर पाकिस्तानचे 6 खेळाडू आयपीएलच्या या टीममध्ये असते, Shoaib Akhtar ने सांगितली फ्रॅन्चायजींची गरज

शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) काही पाकिस्तानी खेळाडूंची निवड केली, जे आयपीएल 2022 खेळू (IPL 2022) शकले असते. आयपीएल 2022 साठी शोएबने पाकिस्तानच्या 6 खेळाडूंची निवड केली.

    मुंबई, 24 मे : आयपीएलच्या (IPL) पहिल्या मोसमात म्हणजेच 2008 साली पाकिस्तानचे क्रिकेटपटू खेळले, पण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातले संबंध खराब झाले आणि अजूनपर्यंत पाकिस्तानी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंदच आहेत. आयपीएलच्या पहिल्या मोसमात पाकिस्तानचे 11 खेळाडू खेळले होते, यामध्ये रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेला शोएब अख्तरही (Shoaib Akhtar) होता. शोएब अख्तर तेव्हा केकेआरकडून (KKR) खेळला होता. शोएब अख्तरने मंगळवारी काही पाकिस्तानी खेळाडूंची निवड केली, जे आयपीएल 2022 खेळू (IPL 2022) शकले असते. आयपीएल 2022 साठी शोएबने पाकिस्तानच्या 6 खेळाडूंची निवड केली. यामध्ये शोएब मलिक, अजहर अली, आसिफ अली, मोहम्मद रिझवान, बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांचा समावेश आहे. याचसोबत शोएबने या क्रिकेटपटूंची कोणत्या टीमला गरज आहे तेदेखील सांगितलं. स्पोर्ट्सकिडासोबत बोलताना शोएब म्हणाला, 'आयपीएल लिलावामध्ये बाबर आझमला (Babar Azam) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सगळ्यात जास्त पैसे देऊन विकत घेतलं असतं. बाबर आयपीएलमध्ये सुपरस्टार असता. शाहीन आफ्रिदीची (Shaheen Afridi) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) गरज होती. दिल्लीच्या टीममधून त्याला सपोर्टही मिळाला असता.' 'मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आरसीबीसाठी (RCB) उपयुक्त ठरला असता, कारण विराटला टीम मॅनची गरज आहे. ओपनर म्हणून रिझवानने नक्कीच प्रभाव पाडला असता,' अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने दिली. शोएब मलिक लखनऊसाठी, आसिफ अली केकेआरसाठी आणि अजहर अली राजस्थानसाठी उपयुक्त ठरता असला, असं मत शोएब अख्तरने मांडलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Shoaib akhtar

    पुढील बातम्या