आयपीएल 2022 च्या लिलावात खरेदी झालेला धवन पहिला खेळाडू आहे. धवनला पंजाब किंग्सने 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मागच्या आयपीएलमध्ये धवन दिल्ली कॅपिटल्ससोबत होता. धवनने आतापर्यंत 203 आयपीएल सामन्यांमध्ये 35.22 च्या सरासरीने 6,165 रन केले आहेत, यात त्याच्या नावावर 2 शतकं आणि 47 अर्धशतकं आहेत. धवन विराट कोहलीनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू आहे. विराटने 219 सामन्यांमध्ये 36.30 च्या सरासरीने 6,499 रन केले आहेत. पंजाब किंग्स आठव्या क्रमांकावर आयपीएलच्या या मोसमात पंजाब किंग्सच्या कामगिरीमध्ये चढ-उतार राहिला. मयंक अग्रवालच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने 11 सामन्यांपैकी 5 मॅच जिंकल्या आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आता उरलेल्या तिन्ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. पंजाबचा पुढचा सामना 13 मे रोजी आरसीबीविरुद्ध आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Preity zinta, Shikhar dhawan