मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : शाहरुखच्या KKR ने वापरलं धक्कातंत्र, दोन्ही कॅप्टन बाहेर, दोनच खेळाडू केले रिटेन

IPL 2022 : शाहरुखच्या KKR ने वापरलं धक्कातंत्र, दोन्ही कॅप्टन बाहेर, दोनच खेळाडू केले रिटेन

शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनी (Shah Rukh Khan's Kolkata Knight Riders) धक्कातंत्राचा वापर केला आहे.

शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनी (Shah Rukh Khan's Kolkata Knight Riders) धक्कातंत्राचा वापर केला आहे.

शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनी (Shah Rukh Khan's Kolkata Knight Riders) धक्कातंत्राचा वापर केला आहे.

मुंबई, 25 नोव्हेंबर : आयपीएल 2022 (IPL 2022) साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अखेरची तारीख 30 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे, त्यामुळे प्रत्येक टीम खेळाडूंसोबत चर्चा करत आहेत. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनी (Shah Rukh Khan's Kolkata Knight Riders) धक्कातंत्राचा वापर केला आहे. केकेआरला या मोसमात फायनलपर्यंत घेऊन जाणारा कर्णधार इयन मॉर्गन याला डच्चू देण्याचा निर्णय टीमने घेतला आहे, तसंच टीमचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आयपीएल 2022 साठी केकेआर सुनिल नारायण आणि आंद्रे रसेल या दोन खेळाडूंना रिटेन करणार आहे. तसंच वरुण चक्रवर्तीला कायम ठेवण्यासाठीही केकेआरचा प्रयत्न असणार आहे. व्यंकटेश अय्यर किंवा शुभमन गिल यांच्यापैकी कोणाला टीममध्ये ठेवायचं याबाबत मात्र केकेआरमध्ये अजून काही निश्चित झालेलं नाही.

हे ही वाचा-IPL 2022 : CSK ने केला रैनाचा पत्ता कट, ऋतुराजची चांदी, धोनीसोबत स्पेशल करार!

प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकते. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू असू शकतात. जर एखाद्या टीमने 4 खेळाडू रिटेन केले तर त्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागतील.

तर दुसरीकडे आयपीएल 2021 ची चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पहिल्या मोसमापासून टीमसोबत असलेल्या सुरेश रैनाचा (Suresh Raina) पत्ता कट केला आहे. आयपीएल 2020 साली रैनाने अखेरच्या क्षणी आयपीएलमधून माघार घेतली, तर आयपीएल 2021 मध्ये रैना संघर्ष करताना दिसला. रैनाचा खराब फॉर्म बघून अखेर धोनीने त्याला टीम बाहेरही केलं. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनी (MS Dhoni), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना रिटेन केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, IPL 2021, Shahrukh khan