• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2022 : CSK ने केला रैनाचा पत्ता कट, ऋतुराजची चांदी, धोनीसोबत स्पेशल करार!

IPL 2022 : CSK ने केला रैनाचा पत्ता कट, ऋतुराजची चांदी, धोनीसोबत स्पेशल करार!

आयपीएल 2022 आधी सगळ्या टीमनी त्यांचे अंतिम खेळाडू (IPL 2022 Players Retention) निश्चित केले आहेत, तर सगळ्या 8 टीमची काही खेळाडूंसोबत अजून बोलणी सुरू आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चॅम्पियन झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमच्या रणनितीबाबतची माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : आयपीएल 2022 आधी सगळ्या टीमनी त्यांचे अंतिम खेळाडू (IPL 2022 Players Retention) निश्चित केले आहेत, तर सगळ्या 8 टीमची काही खेळाडूंसोबत अजून बोलणी सुरू आहेत. 30 नोव्हेंबर ही रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा करण्याची अंतिम तारीख आहे. आयपीएल रिटेनशनच्या नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात 2 भारतीय आणि 2 परदेशी किंवा 3 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडू असू शकतो. खेळाडू रिटेन करण्याची शेवटची तारीख जशी जवळ येत आहे, तसं आता प्रत्येक टीमची रणनितीही समोर येऊ लागली आहे. आयपीएल 2021 ची चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पहिल्या मोसमापासून टीमसोबत असलेल्या सुरेश रैनाचा (Suresh Raina) पत्ता कट केला आहे. आयपीएल 2020 साली रैनाने अखेरच्या क्षणी आयपीएलमधून माघार घेतली, तर आयपीएल 2021 मध्ये रैना संघर्ष करताना दिसला. रैनाचा खराब फॉर्म बघून अखेर धोनीने त्याला टीम बाहेरही केलं. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनी (MS Dhoni), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना रिटेन केलं आहे. चेन्नईच्या टीमची चौथा खेळाडू म्हणून मोईन अलीसोबत (Moeen Ali) चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयपीएलचा पुढचा मोसम भारतातच खेळवला जाणार असल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं, त्यामुळे ऑफ स्पिनर आणि ऑलराऊंडर असलेल्या मोईन अलीला टीममध्ये ठेवण्यासाठी सीएसके इच्छुक आहे. मोईन अलीने जर सीएसकेसोबत राहण्यास नकार दिला तर सॅम करन (Sam Curran) चेन्नई सुपर किंग्सचा रिटेन केलेला चौथा खेळाडू असेल. चेन्नई सुपर किंग्सने धोनीला रिटेन करणं हे अजिबात आश्चर्यकारक नाही, कारण आपण अखेरचा आयपीएल सामना चेन्नईमध्येच खेळू, असं धोनीने काहीच दिवसांपूर्वी सांगितलं होतं. 'मी माझ्या क्रिकेटचं प्लानिंग कायमच केलं आहे. मी माझी शेवटची वनडे रांचीमध्ये खेळलो, माझा अखेरचा टी-20 सामनाही चेन्नईत असेल, अशी आशा आहे,' असं धोनी म्हणाला होता. चेन्नईची टीम चार खेळाडूंना रिटेन करणार असली तरी बहुतेक टीम एवढे खेळाडू कायम ठेवणार नसल्याचं बोललं जातंय. चार खेळाडू टीममध्ये कायम ठेवले तर लिलावामध्ये नवे खेळाडू विकत घ्यायला पैसे कमी शिल्लक राहतील, अशी भीती टीमना आहे. चेन्नईने रिटेन केलेले खेळाडू एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली/सॅम करन
  Published by:Shreyas
  First published: