मुंबई, 9 मे : सध्याच्या क्रिकेट विश्वात फॅब 4 म्हणून नाव कमावलेले विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियमसन (Kane Williamson) आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) 54 व्या सामन्यात शून्य रनवर आऊट झाले. आरसीबीचा माजी कर्णधार असलेला विराट कोहली रविवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात (RCB vs SRH) गोल्डन डकवर (Golden Duck) आऊट झाला, तर दुसरीकडे केन विलियमसन डायमंड डक (Dimond Duck) होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट या मोसमात तिसऱ्यांदा तर आयपीएल इतिहासात सहाव्यांदा पहिल्या बॉलला आऊट झाला. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने या मोसमात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. स्टेडियममध्ये असलेल्या प्रेक्षकांना विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण स्पिनर जगदीश सुचितने विराटला धक्का दिला. विलियमसनने कॅच पकडून विराटला माघारी पाठवलं. विलियमसनही शून्यवर आऊट दुसरीकडे केन विलियमसनही डायमंड डकचा शिकार झाला. हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि विलियमसन इनिंगची सुरूवात करण्यासाठी मैदानात आले. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने बॉलिंगला सुरूवात केली. अभिषेक शर्माने कव्हरच्या दिशेने शॉट मारला, जिकडे शाहबाज अहमद फिल्डिंग करत होता. अभिषेकने रनसाठी बोलावलं ज्यामुळे विलियमसन पळाला, यानंतर शाहबाजने डायरेक्ट स्टम्पवर थ्रो केला, ज्यामुळे विलियमसनला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. गोल्डन डक आणि डायमंड डकमध्ये अंतर जेव्हा बॅटर पहिल्याच बॉलला एकही रन न करता आऊट होत असेल तर त्याला क्रिकेटच्या भाषेत गोल्डन डक म्हणतात. तसंच एकही बॉल न खेळता बॅटरने विकेट गमावली तर त्याला डायमंड डक म्हणलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.