जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मुंबईत बेयरस्टोचं वादळ, 10 बॉलमध्येच ठोकले 50 रन

IPL 2022 : मुंबईत बेयरस्टोचं वादळ, 10 बॉलमध्येच ठोकले 50 रन

IPL 2022 : मुंबईत बेयरस्टोचं वादळ, 10 बॉलमध्येच ठोकले 50 रन

जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) यांच्या आक्रमणामुळे पंजाबने आरसीबीविरुद्धच्या (Punjab Kings vs RCB) सामन्यात 20 ओव्हरमध्ये 209/9 एवढा स्कोअर केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 मे : जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) यांच्या आक्रमणामुळे पंजाबने आरसीबीविरुद्धच्या (Punjab Kings vs RCB) सामन्यात 20 ओव्हरमध्ये 209/9 एवढा स्कोअर केला. बेयरस्टोने 227.59 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत 29 बॉलमध्ये 66 रनची वादळी खेळी केली, यात 7 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. तर लिव्हिंगस्टोनने 42 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 70 रन केले. ओपनिंगला आलेल्या बेयरस्टोच्या वादळी खेळीमुळे पंजाबने पहिल्या 6 ओव्हरमध्येच 83 रन केले होते. बेयरस्टोने त्याच्या खेळीमध्ये 7 सिक्स आणि 4 फोर मारले, म्हणजेच त्याने 11 बॉलमध्ये 58 रनची खेळी केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पहिल्या ओव्हरपासूनच बेयरस्टोने त्याचा इरादा स्पष्ट केला. पहिल्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलला त्याने सिक्स मारली, यानंतर त्याने जॉश हेजलवूडच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 2 फोर मारत 22 रन कुटले. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने मोहम्मद सिराजला सिक्स मारली, याच ओव्हरला शिखर धवननेही फोर मारली, त्यामुळे 3.5 ओव्हरमध्येच पंजाबच्या 50 रन पूर्ण झाल्या. आरसीबीकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर वानिंदु हसरंगाला 2 विकेट घेण्यात यश आलं. ग्लेन मॅक्सवेल आणि शाहबाज अहमद यांना 1-1 विकेट मिळाली. आरसीबीने पाचवी ओव्हर ग्लेन मॅक्सवेलला दिली, तेव्हा शिखर धवनने पहिल्याच बॉलला सिक्स मारला, पण शेवटच्या बॉलला तो बोल्ड झाला. मोहम्मद सिराज टाकत असलेल्या सहाव्या ओव्हरमध्ये बेयरस्टोने एक फोर आणि 3 सिक्स लगावले, ज्यामुळे बेयरस्टोचं अर्धशतक फक्त 21 बॉलमध्येच पूर्ण झालं. पंजाब किंग्सने या सामन्याआधी 11 सामन्यांमध्ये फक्त 5 मॅच जिंकल्या तर 6 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पंजाब किंग्सला त्यांच्या उरलेल्या तिन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात