मुंबई, 7 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज (शनिवार) डबल हेडर होणार असून यामधील पहिली लढत राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs Punjab Kings) यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणारी ही लढत दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थाननं मागील दोन्ही सामने गमावले आहेत. त्यांना ‘टॉप 4 ’ मधील जागा भक्कम करण्यासाठी पंजाबवर कोणत्याही परिस्थितीमध्ये पराभव करावा लागेल. या मॅचमध्ये पंजाब किंग्जचा कॅप्टन मयंक अग्रवालनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबनं त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर राजस्थान रॉयल्सनं एक बदल केला असून करूण नायरच्या जागी यशस्वी जयस्वालचा समावेश केला आहे. राजस्थानच्या या स्पर्धेतील वाटचालीत जोस बटलरचा मोठा वाटा आहे. बटलरनं आत्तापर्यंत या सिझनमध्ये 3 शतकांसह 558 रन केले आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर बटलरचा रेकॉर्ड भक्कम असून त्याच्याकडून आणखी एका मोठ्या खेळीची राजस्थानला अपेक्षा आहे. सर्वाधिक विकेट घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असलेला युजवेंद्र चहल देखील राजस्थानकडे आहे. चहलला अनुभवी आर. अश्विनची साथ असल्यानं राजस्थानचा बॉलिंग अटॅक चांगलाच मजबूत आहे. दुसरिकडं पंजाब किंग्जचा गुजरात टायटन्स विरूद्ध मोठा विजय मिळवल्यानं आत्मविश्वास उंचावलाय. पंजाबचा फास्ट बॉलर कागिसो रबाडा फॉर्मात आहे. रबाडाही आता पर्पल कॅपचा प्रबळ दावेदार आहे. गुजरात विरूद्ध लियाम लिव्हिंगस्टोननं जोरदार फटकेबाजी केली होती. तर अनुभवी शिखर धवननं मोठी खेळी केली होती. कॅप्टन मयंक अग्रवाल आणि जॉनी बेअरस्टोचा खराब फॉर्म ही पंजाबसाठी डोकेदुखी आहे. सातव्या क्रमांकावर असलेल्या पंजाबसाठी टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी राजस्थानवरील विजयासह या दोन्ही खेळाडूंनी फॉर्मात येणे आवश्यक आहे. IPL 2022 : गुजरातला हरवल्यानंतर आणखी 3 टीम मुंबईच्या निशाण्यावर, कुणाचं स्वप्न होणार भंग? पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.