नवी मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल 2022 चा (IPL 2022) 44वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (Rajasthan Royals vs Mumbai Indians) यांच्यात होणार आहे. या मोसमात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या राजस्थानसाठी ही मॅच स्पेशल असणार आहे, कारण काहीच दिवसांपूर्वी निधन झालेल्या ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याला राजस्थानची टीम श्रद्धांजली देणार आहे. यासाठी टीमने खास जर्सीही लॉन्च केली आहे. या जर्सीचा रंग जुन्या जर्सीसारखाच असणार आहे, पण याच्या कॉलरवर SW-23 लिहिलेलं असेल. 23 हा शेन वॉर्नच्या जर्सीचा नंबर होता. राजस्थान रॉयल्सने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. थायलंडमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थानने 2008 साली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. यानंतर राजस्थानला एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही.
Today’s more than just a game.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 30, 2022
Today’s #ForWarnie. 💗#RoyalsFamily | #RRvMI pic.twitter.com/xM7X4CkAv6
वॉर्नसाठी स्टेडियममध्ये खास गॅलरी राजस्थान रॉयल्सने या सामन्यासाठी शेन वॉर्नचा भाऊ जेसन यालाही निमंत्रण दिलं आणि तो या सामन्यासाठी डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये उपस्थित असणार आहे. तसंच वॉर्नला श्रद्धांजली देण्यासाठी स्टेडियममध्ये स्पेशल एरियाही बनवण्यात आला आहे, जिकडे त्याचा फोटो लावण्यात येणार आहे. स्टेडियममध्ये मॅच बघायला येणाऱ्यांना या फोटोला श्रद्धांजली वाहता येणार आहे.
#ForWarnie 💗 pic.twitter.com/vsgAX1LaMR
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 30, 2022
आयपीएलचा पहिला मोसम म्हणजेच 2008 साली कोणीच राजस्थान रॉयल्सना विजयाचा दावेदार मानत नव्हतं, कारण टीममध्ये स्टार खेळाडूही नव्हते, पण शेन वॉर्नने कर्णधार आणि मेंटर म्हणून टीमला जिंकवून दिलं. राजस्थानने फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का दिला. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 163 रन केले, याचा पाठलाग राजस्थानने शेवटच्या बॉलवर केला. शेन वॉर्नने 15 मॅचमध्ये 19 विकेट मिळवल्या, तर सर्वाधिक विकेट घेतल्याबद्दल राजस्थानच्याच सोहेल तनवीरला पर्पल कॅप मिळाली होती. तनवीरने 11 मॅचमध्ये 22 विकेट घेतल्या होत्या.