Home /News /sport /

IPL 2022 : Mumbai Indians आणखी एकाचं प्ले-ऑफ स्वप्न भंगवणार, CSK नंतर ही टीम निशाण्यावर!

IPL 2022 : Mumbai Indians आणखी एकाचं प्ले-ऑफ स्वप्न भंगवणार, CSK नंतर ही टीम निशाण्यावर!

Photo-Mumbai Indians/Twitter

Photo-Mumbai Indians/Twitter

आयपीएल 2022 आता (IPL 2022) अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे, त्यामुळे प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) पोहोचण्याची रेस आणखी रंजक झाली आहे. लीग स्टेजच्या मॅचचा शेवटचा आठवडा सुरू झाला असला, तरीही फक्त एकच टीमचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश झाला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 मे : आयपीएल 2022 आता (IPL 2022) अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे, त्यामुळे प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) पोहोचण्याची रेस आणखी रंजक झाली आहे. लीग स्टेजच्या मॅचचा शेवटचा आठवडा सुरू झाला असला, तरीही फक्त एकच टीमचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश झाला आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) ही प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी एकमेव टीम आहे. तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या रेसमधून आधीच बाहेर झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सने मागच्या सामन्यात सीएसकेचा पराभव करून प्ले-ऑफला पोहोचण्याची त्यांची अखेरची आशा संपवून टाकली, यानंतर आता मुंबईच्या निशाण्यावर सनरायजर्स हैदराबादची टीम आहे. मुंबई आणि हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची टीम आठव्या क्रमांकावर आहे. 12 मॅचमध्ये त्यांनी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी हैदराबादला आता उरलेले दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत, ज्यामुळे त्यांचा नेट रनरेट सुधारेल, याशिवाय त्यांना इतर टीमच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे. मुंबईविरुद्ध हैदराबादचा पराभव झाला, तर त्यांचं आव्हान संपुष्टात येईल, कारण सध्या 7 टीमचे 12 किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंट्स आहेत. कमजोर बॅटिंग हैदराबादच्या बॉलरनी या मोसमात चांगली कामगिरी केली असली तरी त्यांच्या बॅटिंगनी निराशा केली. कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) 12 मॅचमध्ये फक्त 208 रन केले आहेत. मधल्या फळीमध्ये राहुल त्रिपाठी, एडन मार्करम आणि निकोलस पूरण आहेत, पण त्यांना सातत्यपूर्ण खेळी करता आली नाही. खालच्या फळीमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या रूपात ऑलराऊंडर असला तरी त्यालाही दुखापतींनी सतावलं आहे. मुंबईसमोर हैदराबादच्या बॉलिंगचं आव्हान हैदराबादकडे उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन हे फास्ट बॉलर फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे मुंबईच्या बॅटरना या तीन बॉलरपासून सावध राहावं लागणार आहे, कारण वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फास्ट बॉलरना अनुकूल आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, SRH

    पुढील बातम्या