मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : CSK आणि MI ची भीती संपली, चेन्नई-मुंबईला आता कोणीच घाबरत नाही!

IPL 2022 : CSK आणि MI ची भीती संपली, चेन्नई-मुंबईला आता कोणीच घाबरत नाही!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गतविजेती चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 11 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गतविजेती चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत या दोन टीमचंच आयपीएलवर प्रभुत्व राहिलं, पण यावेळी इतर टीमनी या मुंबई आणि चेन्नईला धोबीपछाड दिली आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मते चेन्नई आणि मुंबई या दोन्ही टीमची भीती आता संपली आहे, तसंच त्यांना आता कोणीच घाबरत नाही.

आयपीएल 2022 मध्ये मुंबई आणि चेन्नईला अजून पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना शास्त्री यांनी त्यांचं मत मांडलं. मुंबई आणि सीएसकेला विरोधी टीमनी मागे टाकलं आहे. लिलावामध्ये बहुतेक टीमनी चांगल्या खेळाडूंची निवड केली, त्यामुळे या टीम आता मुंबई आणि चेन्नईला घाबरत नाहीत, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.

'मुंबई आणि चेन्नईच्या टीम खेळामध्ये दिसतच नाहीत, हे जास्त निराशाजनक आहे. मी आयपीएलच्या एका आठवड्यापासून सांगतो आहे. चेन्नई आणि मुंबईची जी भीती होती, ती आता नाही, कोणीही त्यांना घाबरत नाही, त्यांचा काळ आता राहिला नाही. या टीममध्ये आता एक्स फॅक्टरही नाही,' असं वक्तव्य शास्त्रींनी केलं.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई आणि चेन्नई यांनी पहिल्या चारही मॅच गमावल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई नवव्या आणि चेन्नई दहाव्या क्रमांकावर आहे. या हंगामात एकही मॅच न जिंकलेल्या मुंबई आणि चेन्नई या दोनच टीम आहेत.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Mumbai Indians, Ravi shastri