मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL : 12 वर्षांची साथ सुटणार, मुंबई इंडियन्स Kieron Pollard ला रिलीज करणार!

IPL : 12 वर्षांची साथ सुटणार, मुंबई इंडियन्स Kieron Pollard ला रिलीज करणार!

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर राहिलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पुढच्या मोसमात टीममध्ये मोठा बदल करू शकते. इतके वर्ष मुंबईचा स्टार खेळाडू राहिलेल्या कायरन पोलार्डला (Kieron Pollard) मुंबई रिलीज करू शकते.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर राहिलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पुढच्या मोसमात टीममध्ये मोठा बदल करू शकते. पाच वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईची आयपीएल इतिहासातली ही सगळ्यात खराब कामगिरी होती, त्यामुळे टीम चिंतन करणार आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राच्या (Aakash Chopra) मते मुंबई पुढच्या मोसमात कायरन पोलार्डला (Kieron Pollard) रिलीज करू शकते.

कायरन पोलार्डने आयपीएलच्या या मोसमात निराशाजनक कामगिरी केली. पोलार्डच्या बॅटमधून फक्त 144 रन आले. त्याच्या या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने त्याला शेवटच्या काही सामन्यांमधून बाहेर बसवलं. पोलार्ड त्या 4 खेळाडूंमध्ये होता ज्याला मुंबईने लिलावाआधी रिटने केलं होतं. यासाठी मुंबईने 6 कोटी रुपये मोजले होते.

आपण कदाचित कायरन पोलार्डचा अखेरचा मोसम बघितला आहे, असं आकाश चोप्रा म्हणाला. जर कायरन पोलार्डला रिलीज केलं तर टीमचे 6 कोटी रुपये फ्री होतील. याशिवाय मुरुगन अश्विन (1.6 कोटी), टायमल मिल्स (1.5 कोटी) आणि जयदेव उनाडकट (1.3 कोटी) या खेळाडूंनाही मुंबई रिलीज करू शकते, अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.

कायरन पोलार्ड 35 वर्षांचा झाला आहे, तसंच मागच्या काही काळापासून तो खराब फॉर्ममध्ये आहे. तसंच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता तो आयपीएलच्या पुढच्या मोसमात खेळेल का नाही, याबाबत साशंकता आहे. मुंबईने वारंवार पोलार्डला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तो टीमसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला. मुंबईला सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन बनवण्यात पोलार्डची भूमिका महत्त्वाची ठरली. 2010 पासून पोलार्ड मुंबई इंडियन्सचा भाग आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians