मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्समध्ये ऑल इज नॉट वेल? खेळाडूने डिलीट केलं ते ट्वीट

IPL 2022 : मुंबई इंडियन्समध्ये ऑल इज नॉट वेल? खेळाडूने डिलीट केलं ते ट्वीट

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पाच वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या सातही सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास अशक्य झालं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 23 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पाच वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या सातही सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास अशक्य झालं आहे, त्यातच आता मुंबई इंडियन्सचा डावखुरा फास्ट बॉलर टायमल मिल्सने (Tymal Mills) डिलीट केलेल्या ट्वीटमुळे गोंधळ वाढला आहे.

फास्ट बॉलर धवल कुलकर्णी मुंबईच्या टीममध्ये येणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. यानंतर लगेचच टायमल मिल्स याला दुखापत झाल्याचंही बोललं जाऊ लागलं, पण टायमल मिल्सने आपल्याला दुखापत झाली नसल्याचं ट्वीट केलं. 'तू कोण आहेस आणि तुला ही माहिती कुठून मिळाली हे मला माहिती नाही, पण तूझा हा दावा चुकीचा आहे. मी ठीक आहे, तुझी ही पोस्ट डिलीट कर,' असं टायमल मिल्स म्हणाला.

टायमल मिल्सने यानंतर हे ट्वीट डिलीट केलं, पण यावरून गोंधळ निर्माण झाला. मिल्सने 5 मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या, तसंच तो मुरुगन अश्विनसोबत मुंबईचा या मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडूही आहे. राजस्थानविरुद्धची 3/35 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे, पण यानंतर पंजाब आणि लखनऊविरुद्धच्या मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही.

33 वर्षांचा धवल कुलकर्णी आयपीएलच्या याआधीच्या सगळ्या 14 मोसमांमध्ये खेळला आहे, पण या मोसमासाठी झालेल्या लिलावात त्याला कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही. आयपीएलमध्ये धवल मुंबई, राजस्थान आणि गुजरात लायन्सच्या टीममध्ये होता. 92 आयपीएल मॅचमध्ये धवलने 86 विकेट घेतल्या आहेत.

धवल कुलकर्णी 2021 साली मुंबईच्या टीमचा भाग होता, पण लिलावाआधी मुंबईने त्याला रिलीज केलं. या आयपीएलमध्ये मुंबईचे बॉलर अपयशी ठरत आहेत, जसप्रीत बुमराहशिवाय इतर बॉलर मोठ्या प्रमाणावर रन देत आहेत, त्यामुळे मुंबई धवलला टीममध्ये परत बोलवू शकते, असं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians