जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : विराटची 'गांधीगिरी', पंगा घेणाऱ्या मुकेशलाही मागावी लागली माफी, Video

IPL 2022 : विराटची 'गांधीगिरी', पंगा घेणाऱ्या मुकेशलाही मागावी लागली माफी, Video

IPL 2022 : विराटची 'गांधीगिरी', पंगा घेणाऱ्या मुकेशलाही मागावी लागली माफी, Video

मैदानामध्ये विरोधी टीमच्या खेळाडूंसोबत पंगा घेणाऱ्या विराट कोहलीची (Virat Kohli) गांधीगिरी पाहायला मिळाली. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी आणि सीएसके (RCB vs CSK) यांच्यात पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात विराटने चाहत्यांची मनं जिंकली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 4 मे : मैदानामध्ये विरोधी टीमच्या खेळाडूंसोबत पंगा घेणाऱ्या विराट कोहलीची (Virat Kohli) गांधीगिरी पाहायला मिळाली. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी आणि सीएसके (RCB vs CSK) यांच्यात पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात विराटने चाहत्यांची मनं जिंकली. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर धोनीने पहिलीच ओव्हर डावखुरा फास्ट बॉलर मुकेश चौधरीला (Mukesh Choudhary) दिली. मुकेशने विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिससमोर चांगली सुरूवात केली. लागोपाठ दोन बॉलला एकही रन न दिल्यानंतर विराटने ओव्हरच्या पाचव्या बॉलला खणखणीत फोर मारली.ओव्हरचा शेवटचा बॉल विराटने सरळ मुकेश चौधरीच्या दिशेने मारला, यानंतर मुकेशने विराटच्या दिशेने बॉल जोरात फेकला.

जाहिरात

मुकेशने फेकलेला बॉल विराटच्या मांडीला लागला, तेव्हा विराट मुकेश चौधरीकडे बघून हसला. मुकेश चौधरीनेही यानंतर विराटची माफी मागितीली तेव्हा विराटने थम्प्स अप केलं. पहिले बॅटिंग करणाऱ्या आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 173 रन केले. महिपाल लोमरोरने सर्वाधिक 42 रन तर फाफ डुप्लेसिसने 38 आणि विराटने 33 रनची खेळी केली. सीएसकेकडून महीश तीक्षणाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय मोईन अलीला 2 आणि ड्वॅन प्रिटोरियसला 1 विकेट मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात