मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : पोलार्डने KKR ला दिला 440 व्होल्टचा झटका, जगातल्या नंबर 1 बॉलरला धू धू धुतलं!

IPL 2022 : पोलार्डने KKR ला दिला 440 व्होल्टचा झटका, जगातल्या नंबर 1 बॉलरला धू धू धुतलं!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबईने (MI vs KKR) 20 ओव्हरमध्ये 161/4 पर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), तिलक वर्मा (Tilak Varma) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांनी केलेल्या धमाक्यामुळे मुंबईला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.

पुढे वाचा ...

पुणे, 6 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबईने (MI vs KKR) 20 ओव्हरमध्ये 161/4 पर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), तिलक वर्मा (Tilak Varma) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांनी केलेल्या धमाक्यामुळे मुंबईला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. पोलार्डने तब्बल 440 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, त्याने 5 बॉलमध्ये 3 सिक्स मारत नाबाद 22 रन केले. तिलक वर्मा 27 बॉलमध्ये 38 रनवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने 36 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली, त्याने 5 फोर आणि 2 सिक्स लगावल्या.

पोलार्डने टेस्ट क्रिकेटमधला नंबर एक बॉलर पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 23 रन कुटले, यात 3 सिक्सचा समावेश होता. कमिन्सने त्याच्या 4 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या, पण 49 रनही दिले.

या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण मुंबईची सुरूवात अत्यंत खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 12 बॉलमध्ये 3 रन करून आऊट झाला, तर इशान किशनने (Ishan Kishan) 21 बॉलमध्ये 14 रनची खेळी केली. रोहित आणि इशान या दोघांनाही मैदानात संघर्ष करावा लागला. आपली पहिलीच मॅच खेळणारा बेबी एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसने 19 बॉलमध्ये 29 रन केले, यात 2 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता.

केकेआरकडून कमिन्सला 2 तर उमेश यादव आणि वरुण चक्रवर्तीला 1 विकेट घेण्यात यश आलं. मुंबईला त्यांच्या बॅटिंगच्या पहिल्या 15 ओव्हरमध्ये 5.67 च्या इकोनॉमी रेटने 85 रनच करता आल्या, यात त्यांनी 3 विकेट गमावल्या. पहिल्या 15 ओव्हरमध्ये मुंबईने फक्त 5 फोर आणि 3 सिक्स मारल्या. पण अखेरच्या 5 ओव्हरमध्ये मुंबईला 15.20 च्या इकोनॉमी रेटने 1 विकेट गमावत 76 रन करता आले. अखेरच्या 5 ओव्हरमध्ये मुंबईने 6 फोर आणि 6 सिक्स मारल्या.

First published:

Tags: Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians