जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : दीपक चहर झाला मालामाल, धोनीच्या टीमनं मोठी किंमत मोजून केली खरेदी

IPL Auction 2022 : दीपक चहर झाला मालामाल, धोनीच्या टीमनं मोठी किंमत मोजून केली खरेदी

IPL Auction 2022 : दीपक चहर झाला मालामाल, धोनीच्या टीमनं मोठी किंमत मोजून केली खरेदी

टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहरला (Deepak Chahar) त्याने मागील काही महिन्यात केलेल्या चांगल्या कामगिरीचा मोठा फायदा झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी :  टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहरला (Deepak Chahar) त्याने मागील काही महिन्यात केलेल्या चांगल्या कामगिरीचा मोठा फायदा झाला आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) दीपक मालामाल झाला आहे. दीपकला चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings)  14 कोटींना खरेदी केले. दीपकला खरेदी करण्यासाठी आयपीएल टीममध्ये जोरदार चुरस रंगली होती. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद(SRH) टीममध्ये सुरूवातीला चुरस रंगली होती. त्यानंतर चेन्नईनंही दीपकवर बोली लावली. राजस्थान रॉयल्सनं देखील दीपकवर बोली लागल्यानं त्याची किंमत आणखी वाढली. अखेर, चेन्नईनं 14 कोटींमध्ये दीपकला खरेदी केले.

जाहिरात

दीपक यापूर्वी देखील चेन्नई सुपर किंग्सकडेच होता. मागील आयपीएल सिझनमध्ये चेन्नईच्या विजेतेपदात दीपकनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. दीपकनं आजवर 63 आयपीएल मॅचमध्ये 7. 8 च्या इकोनॉमी रेटनं 59 विकेट्स घेतल्या आहेत. तर टीम इंडियाकडून 7 वन-डेमध्ये त्यानं 10 विकेट्स घेतल्या असून 2 हाफ सेंच्युरीसह 179 रन केले आहेत. IPL Auction 2022 : दिनेश कार्तिकची ‘ती’ इच्छा अखेर अपूर्ण ! या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये जुने खेळाडू खरेदी करण्यावरच चेन्नईचा भर दिसत आहे. रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो, अंबती रायुडूनंतर दीपक चहर या आणखी एका जुन्या खेळाडूला चेन्नईनं करारबद्ध केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात