मुंबई, 21 मार्च : आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, त्याआधी आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सरावाला सुरूवात केली आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली होती. आयपीएलच्या प्ले-ऑफमध्येही टीमला प्रवेश मिळाला नव्हता, यंदा मात्र पाच वेळा चॅम्पियन झालेली मुंबई सरावात कोणतीही कसर ठेवताना दिसत नाहीये. टीमचे महत्त्वाचे खेळाडू आता दुसऱ्या फ्रॅन्चायजीकडून खेळणार आहेत, यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya), कृणाल पांड्या आणि क्विंटन डिकॉक यांचा समावेश आहे. या मोसमात मुंबई पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (MI vs DC) 27 मार्चला खेळणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना रंगेल.
मुंबई इंडियन्सने टीमच्या तयारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये कायरन पोलार्ड (Kieron Pollard) मैदानाच्या चारही बाजूंना मोठे शॉट मारताना दिसत आहे. तर बेबी डिव्हिलियर्स नावाने प्रसिद्ध झालेला दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविसही (Dewald Brevis) मोठे शॉट मारत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये डेवाल्डने उल्लेखनीय कामगिरी केली, त्यामुळे मुंबईने त्याला लिलावात विकत घेतलं.
Exquisite shots, yorkers and class! ️ Sit back and enjoy a minute long net session featuring Polly, Boom and Brevis! #OneFamily #MumbaiIndians @KieronPollard55 @Jaspritbumrah93 MI TV pic.twitter.com/X0vz7qbHNx
— Mumbai Indians (@mipaltan) March 21, 2022
इशान किशन सगळ्यात महागडा
मुंबई इंडियन्सने लिलावामध्ये इशान किशनला (Ishan Kishan) 15.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. या लिलावातला किशन सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. याशिवाय मुंबईने सिंगापूरमध्ये जन्मलेल्या आक्रमक बॅटर टीम डेव्हिड, फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर आणि जयदेव उनाडकट यांनाही टीममध्ये स्थान दिलं. दुखापतीमुळे आर्चर आयपीएलचा यंदाचा मोसम खेळू शकणार नाही.
आयपीएलचा यंदाचा हा 15 वा मोसम आहे. मुंबई इंडियन्सच्या 5 ट्रॉफीशिवाय एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने 4 वेळा स्पर्धा जिंकली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians