मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : KGF ने बुडवलं RCB चं जहाज, या तिघांनी फिरवलं स्वप्नावर पाणी!

IPL 2022 : KGF ने बुडवलं RCB चं जहाज, या तिघांनी फिरवलं स्वप्नावर पाणी!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीचं (RCB) आव्हान संपुष्टात आलं आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा (Rajasthan Royals vs RCB) धुव्वा उडवला आहे. आरसीबीचे KGF त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरले.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीचं (RCB) आव्हान संपुष्टात आलं आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा (Rajasthan Royals vs RCB) धुव्वा उडवला आहे. आरसीबीचे KGF त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरले.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीचं (RCB) आव्हान संपुष्टात आलं आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा (Rajasthan Royals vs RCB) धुव्वा उडवला आहे. आरसीबीचे KGF त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरले.

मुंबई, 27 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीचं (RCB) आव्हान संपुष्टात आलं आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा (Rajasthan Royals vs RCB) धुव्वा उडवला आहे. आरसीबीने दिलेलं 158 रनचं आव्हान राजस्थानने बटलरच्या (Jos Buttler) वादळी शतकामुळे अगदी सहज पार केलं. बटलरचं या मोसमातलं हे चौथं शतक होतं. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 157/8 वर रोखलं.

आरसीबीच्या या खराब बॅटिंगचं कारण ठरले ते त्यांचे KGF. कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस हे तिन्ही महत्त्वाचे खेळाडू करो या मरो सामन्यात अपयशी ठरले. विराट कोहली (Virat Kohli) 7 रनवर, डुप्लेसिस (Faf Du Plessis) 25 आणि मॅक्सवेल (Glenn Maxwell) 24 रनवर आऊट झाला. यातल्या डुप्लेसिस आणि मॅक्सवेल यांना चांगल्या सुरूवातीनंतरही मोठा स्कोअर करता आला नाही.

आयपीएल 2022 च्या संपूर्ण मोसमातच विराट, डुप्लेसिस आणि मॅक्सवेलला नेहमीसारखा धमाका करता आला नाही. आयपीएलच्या या मोसमात विराटने 16 मॅचमध्ये 22.73 च्या सरासरीने आणि 115.98 च्या स्ट्राईक रेटने 341 रन केले आहेत, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 73 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.

दुसरीकडे फाफ डुप्लेसिस आरसीबीचा या मोसमातला सर्वाधिक रन करणारा खेळाडू असला तरी त्याला स्पर्धेवर इम्पॅक्ट पाडता आला नाही. डुप्लेसिसने 16 मॅचमध्ये 127.52 च्या स्ट्राईक रेटने आणि 31.20 च्या सरासरीने 468 रन केले, त्याला या मोसमात 3 अर्धशतकं करता आली.

ग्लेन मॅक्सवेलने 13 मॅचमध्ये 27.36 च्या सरासरीने आणि 169.10 च्या स्ट्राईक रेटने 301 रन केले. मॅक्सवेलने संपूर्ण मोसमात फक्त एकच अर्धशतक केलं.

नशीब किती वेळा देणार साथ?

नशिबाने आरसीबीला या मोसमात बरीच साथ दिली. मुंबई इंडियन्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्लीचा (MI vs DC) पराभव केला, त्यामुळे आरसीबीचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश झाला. यानंतर एलिमिनेटर सामन्यातही लखनऊच्या खराब फिल्डिंगमुळे आरसीबीचा फायदा झाला. लखनऊविरुद्धच्या सामन्यातही विराट, डुप्लेसिस आणि मॅक्सवेल अपयशी ठरले, पण रजत पाटीदारने (Rajat Patidar) शतक केलं तर कार्तिकने विस्फोटक खेळी केली. या सामन्यात लखनऊने पाटीदार आणि दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) कॅच सोडून दोघांनाही जीवनदान दिलं.

First published:

Tags: Glenn maxwell, Ipl 2022, RCB, Virat kohli