जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Schedule 2022 : 65 दिवस 74 मॅच आणि 10 टीम, पाहा आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक!

IPL Schedule 2022 : 65 दिवस 74 मॅच आणि 10 टीम, पाहा आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक!

IPL Schedule 2022 : 65 दिवस 74 मॅच आणि 10 टीम, पाहा आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक!

आयपीएल 2022 च्या मोसमाला (IPL 2022) उद्या म्हणजेच 26 मार्च शनिवारपासून सुरूवात होत आहे. पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च : आयपीएल 2022 च्या मोसमाला (IPL 2022) उद्या म्हणजेच 26 मार्च शनिवारपासून सुरूवात होत आहे. पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होईल. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे मागचे दोन मोसम युएईमध्ये खेळवले गेले होते. 2020 ची संपूर्ण आयपीएल युएईमध्ये झाली, तर 2021 आयपीएलची सुरूवात भारतात झाली, पण टीममध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली, यानंतर दुसरा राऊंड युएईमध्ये खेळवला गेला. यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाल्यामुळे आयपीएल भारतातच होईल. कोरोनाचा प्रभाव कमी असला तरी प्रत्येक टीमला बायो-बबलमध्ये राहावं लागणार आहे. कोरोना आणि बायो-बबलमुळे प्रवास टाळण्यासाठी यंदा लीग स्टेजचे सगळे सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम आणि पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये आयपीएलच्या लीग स्टेजचे 70 सामने होतील. तर प्ले-ऑफ आणि फायनल अशा एकूण 4 मॅच कुठे खेळवल्या जातील, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, पण प्ले-ऑफ आणि फायनलच्या मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. **आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

News18

News18

** आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 8 ऐवजी 10 टीम सहभागी झाल्या आहेत. लखनऊ सुपर जाएंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीम पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहेत. आयपीएलच्या दोन टीमची संख्या वाढवल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन घेण्यात आला. या लिलावाआधी प्रत्येक टीमना त्यांचे काही खेळाडू सोडावे लागले, त्यामुळे या मोसमात आता बरेच खेळाडू नवीन टीमकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 10 टीम सहभागी होत असल्यामुळे प्रत्येक टीमला 5-5 च्या दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. टीमची दोन ग्रुपमध्ये विभागणी झाली असली तरी प्रत्येक टीम आधीप्रमाणेच 14 मॅच खेळणार आहे. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या टीम आहेत, तर ग्रुप बी मध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात जाएंट्स यांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ipl 2022
  • First Published :
जाहिरात
जाहिरात