मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : Live मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच Virat Kohli ने दिली अशी रिएक्शन, VIDEO

IPL 2022 : Live मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच Virat Kohli ने दिली अशी रिएक्शन, VIDEO

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला. तेव्हा स्टेडियममधून एक प्रेक्षक विराट कोहलीला (Virat Kohli) भेटण्यासाठी थेट मैदानात आला, यानंतर सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला पकडलं आणि खांद्यावर उचलून मैदानाबाहेर नेलं.

पुढे वाचा ...

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या सामन्यात आरसीबीने लखनऊचा 14 रननी पराभव केला. या पराभवामुळे लखनऊचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं. तर आरसीबी दुसरा क्वालिफायर सामना 27 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनवर एलिमिनेटरची मॅच सुरू होती, तेव्हा स्टेडियममधून एक प्रेक्षक थेट मैदानात आला, यानंतर सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला पकडलं आणि खांद्यावर उचलून मैदानाबाहेर नेलं.

मैदानात घुसलेली ही व्यक्ती विराट कोहलीला (Virat Kohli) भेटण्यासाठी त्याच्या जवळ येत होती, तेव्हाच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं. मैदानात हा सगळा प्रकार घडत असतानाची विराट कोहलीची रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

लखनऊ सुपर जाएंट्सची बॅटिंग सुरू असताना शेवटच्या ओव्हरमध्ये ही घटना घडली, जेव्हा हर्षल पटेल बॉलिंग टाकत होता. लखनऊचा बॅटर दुष्मंता चमीराने हर्षल पटेलला सिक्स मारी, यानंतर लखनऊला विजयासाठी 3 बॉलमध्ये 16 रन करायच्या होत्या, त्यावेळी मैदानात प्रेक्षक घुसल्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला.

ही व्यक्ती जवळ येत असल्याचं पाहून विराटने सुरक्षा रक्षकांच्या दिशेने इशारा केला, यानंतर चार सुरक्षा रक्षक त्याला पकडण्यासाठी धावले.

14 रननी बँगलोरचा विजय

आरसीबीने या सामन्यात पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 207 रन केले. आरसीबीकडून रजत पाटीदारने 112 रनची नाबाद खेळी केली. याशिवाय दिनेश कार्तिकने नाबाद 37 रन केले. 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने 20 ओव्हरमध्ये 193/6 एवढा स्कोअर केला.

First published:

Tags: Ipl 2022, RCB, Virat kohli