मुंबई, 16 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलं आहे. लीग स्टेजच्या सामन्यांचा हा शेवटचा आठवडा आहे, त्यामुळे प्ले-ऑफची (IPL Play Off) रेस आणखी रंजक झाली आहे. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स ही एकमेव टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. तर मुंबई आणि चेन्नई आधीच प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाल्या आहेत, त्यामुळे 3 स्थानांसाठी 7 टीममध्ये स्पर्धा रंगत आहे. प्ले-ऑफच्या दृष्टीने आज अत्यंत महत्त्वाचा असा पंजाब आणि दिल्ली (Punjab Kings vs Delhi Capitals) यांच्यातला सामना रंगत आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवालने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने या सामन्यासाठी टीममध्ये दोन बदल केले आहेत. खलील अहमद चेतन सकारियाऐवजी टीममध्ये आला आहे, तर श्रीकर भरतऐवजी सरफराजला संधी देण्यात आली आहे. पंजाबने मात्र त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. पंजाब आणि दिल्लीच्या या सामन्याकडे केकेआर आणि आरसीबीचं खास लक्ष असेल, कारण या दोन टीमच्या कामगिरीवर त्यांचं प्ले-ऑफचं भवितव्य अवलंबून आहे. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली पाचव्या आणि पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि पंजाबने प्रत्येकी 12 मॅच खेळल्या असून 6 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आणि 6 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. नेट रनरेट चांगला असल्यामुळे दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. दिल्लीची टीम डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, ऋषभ पंत, ललित यादव, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्किया, खलील अहमद पंजाबची टीम जॉनी बेयरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.