मुंबई, 15 एप्रिल: आयपीएलच्या 15 व्या हंगामावर कोरोनाचं संकट येण्याची शक्यता आहे. कारण आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे (DC) फिजिओ पॅट्रिक फरहार्ट(Patrick Farhart) यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी आयपीएलने याबाबतची माहिती दिली आहे. पॅट्रिक फरहार्ट संध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. आयपीएल (IPL) 2022 ची ही पहिली पॉझिटिव्ह केस आहे . गतवर्षी कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 चा हंगाम अर्ध्यातूनच थांबवावा लागला. त्यानंतर उर्वरित आयपीएल सामने दुबईमध्ये घेण्यात आले होते. 2021 मध्ये सनराइजर्स हैदराबाद (SRH) चा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे ही वाचा- IPL 2022 : हार्दिक पांड्यानं केलं लाखोंचं नुकसान, मॅच थांबवण्याची आली वेळ त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित कऱण्यात आले होते. 2021 मध्ये 29 लीग सामने झाल्यानंतर बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने दुबईमध्ये खेळवले होते. तर कोरोना महामारीमध्ये 2020 चा हंगामही दुबईत झाला होता.
Delhi Capitals physio Patrick Farhart has tested positive for COVID19. He's been monitored closely.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 15, 2022
ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीचा पुढील सामना शनिवारी होणार आहे. दिल्लीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यापैकी दिल्लीला दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा पुढील सामना शनिवारी होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर दिल्ली आरसीबी संघासोबत भिडणार आहे.